Sant Sohirobanath Ambiye College of Arts and Commerce Goa  Dainik Gomantak
गोवा

Goa News: आंबिये महाविद्यालयाला ‘नॅक’चे ‘ए’ मानांकन; गोव्यातील दुसरे सरकारी महाविद्यालय

Sant Sohirobanath Ambiye College of Arts and Commerce Virnoda Pernem: संत सोहिरोबानाथ आंबिये कला आणि वाणिज्य महाविद्यालय विर्नोडा, पेडणे यांना नॅकचे ‘ए’ मानांकन प्राप्त झाले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: संत सोहिरोबानाथ आंबिये कला आणि वाणिज्य महाविद्यालय विर्नोडा, पेडणे यांना नॅकचे ‘ए’ मानांकन प्राप्त झाले आहे. या महाविद्यालयाला यंदा पहिल्यांदाच हे मानांकन मिळाले असून यापूर्वी दोन नॅकच्या चाचणी ‘बी’ प्लस मानांकन मिळाले होते.

खांडोळानंतर यंदा संत सोहिरोबानाथ आंबिये हे दुसरे सरकारी महाविद्यालय आहे, ज्यांना नॅकचे ‘ए’ मानांकन मिळाले आहे. या महाविद्यालयाचे मूल्यांकन करण्यासाठी प्रा. डॉ. आर. एस. मीना यांच्या अध्यक्षतेखाली समिती आली होती. या समितीत प्रा. डॉ. बालगोविंदन हरिहरन, डॉ. अली मोहद दार यांचा समावेश होता.

संत सोहिरोबानाथ आंबिये महाविद्यालयाची स्थापना १९९३-९४ साली झाली असून गोव्यातील उत्कृष्ट साधनसुविधा असलेल्या महाविद्यालयांमध्ये त्याची गणना होते. गेल्या काही वर्षात या महाविद्यालयाने मोठ्या प्रमाणात प्रगती केली आहे. या महाविद्यालयात सुमारे ७०० हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

केवळ साधनसुविधा असल्या म्हणजे नॅकचे ‘ए’ मूल्यांकन मिळते असे नसून त्यासाठी शिक्षकांचे मेहनत आणि विद्यार्थ्यांचा सहभाग महत्त्वाचा ठरतो. आम्हाला उच्च शिक्षण संचालनालयाचा लाभलेले सहाय्य तसेच शिक्षण सचिवांचे देखील सदोदित सहकार्य लाभले असून या यशात सर्वाचे योगदान असल्याने मी सर्वांचे आभार मानते तसेच अभिनंदनही करते.
प्रविणा केरकर, प्रभारी प्राचार्य

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier Exposition: शब्द नाही भाव महत्वाचा, सेंट झेवियर यांनी ऐकली हावभावांची प्रार्थना; गोव्यात पहिल्यांदाच माससाठी सांकेतिक भाषेचा वापर

Goa Live News: कामुर्लीच्या उपसरपंच्यांना मारहाण केल्याप्रकरणी एकाला अटक

Pooja Naik Case: '..भाजप नेत्यांना केलेल्या कॉलचा संदर्भ सापडेल'; Cash For Job प्रकरणी पालेकर यांनी केली सीडीआर रिपोर्टची मागणी

Saint Francis Xavier Exposition: नोव्हेनाच्या पहिल्याच दिवशी अलोट गर्दी! जुने गोवेत 1 लाख भाविक; अजून आकडा वाढणार

Ranbir Kapoor At IFFI: 'मला चित्रपट दिग्दर्शक व्हायचंय पण..'; रणबीरने व्यक्त केली महत्वाकांक्षा; प्रेक्षकांना दिली खूशखबर

SCROLL FOR NEXT