Goa Protest Dainik Gomantak
गोवा

Saint Francis Xavier News: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Saint Francis Xavier: दुसरीकडे वेलिंगकर यांच्या अटकपूर्व जामिनासाठी हालचाली सुरू झाल्या असल्याचे सांगण्यात आले.

गोमंतक ऑनलाईन टीम

Saint Francis Xavier DNA Test Demand Row

मडगाव/डिचोली: सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याच्या निषेधार्थ सुभाष वेलिंगकर यांना अटक करा, या मागणीवर ठाम असलेल्या आंदोलकांनी आज (०५ ऑक्टोबर) राज्यभर निदर्शने केली. मडगावात आंदोलन आणखी तीव्र करीत शहरातील वाहतूक अडवून ठेवली.

दुसरीकडे वेलिंगकर यांच्या अटकपूर्व जामिनासाठी हालचाली सुरू झाल्या असल्याचे सांगण्यात आले. हिंदुत्ववादी संघटना मात्र वेलिंगकर यांच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहिल्या आहेत.

मडगावात कदंब बसस्थानक, जिल्हाधिकारी कार्यालय आणि कोलवा सर्कल या तिन्ही भागांत आंदोलकांनी गर्दी करून रस्ता अडवून धरला. या आंदोलकांच्या गर्दीतून वाट काढत पुढे जाण्याचा प्रयत्न केलेल्या एका दुचाकीचालकां तरुणावर आंदोलकांनी हल्लाही केला. या तरुणाने आमच्याकडे अरेरावी केली.

त्यामुळे आंदोलकांचा तोल सुटला, असे आंदोलनात आघाडीवर असलेल्या प्रतिमा कुतिन्हो यांनी सांगितले. शनिवारी सकाळी १० वाजेपर्यंत वेलिंगकर यांना अटक करा, असा निर्वाणीचा इशारा शुक्रवारी रात्री देत आंदोलकांनी आंदोलन स्थगित केले होते.

मात्र, सकाळपर्यंत त्यांना अटक न केल्यामुळे आंदोलकांनी मडगाव पोलिस फातोर्डा पोलिस स्थानकांसमोर निदर्शने केली. त्यानंतर आंदोलकांनी कोलवा सर्कल आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमून रस्ता अडवून ठेवला. या आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी सांत आंद्रेचे आमदार वीरेश बोरकर हेही मडगावात दाखल झाले होते.

विद्यार्थ्यांची ससेहोलपट

आंदोलकांनी कदंब बसस्थानक अडवून ठेवल्यामुळे विद्यार्थ्यांना आणायला जाणाऱ्या बसेस विद्यालयापर्यंत जाऊ शकल्या नाहीत. त्यामुळे या विद्यार्थ्यांनाही पायपीट करावी लागली. हॉस्पिसियोत वडिलांची विचारपूस करण्यासाठी जाणाऱ्या एका युवकाची आंदोलकांनी कार अडवून ठेवल्यामुळे काही काळ आंदोलक आणि त्या युवकामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली.

पर्वरीत रविवारी जाहीर सभा

वेलिंगकर यांना समर्थन देण्यासाठी हिंदूत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते आज (शनिवारी) सकाळी डिचोली पोलिस स्थानकाजवळ जमा झाले होते. यावेळी डिचोलीत कडक पोलिस बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान, प्रा. वेलिंगकर यांच्या समर्थनार्थ उद्या (रविवारी) पर्वरी येथे सकाळी 10 वा. जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. हिंदू रक्षा महाआघाडीतर्फे या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

वेलिंगकरांना कुठल्याही क्षणी अटक !

या आंदोलनाच्या पार्रवभूमीवर शिवोलीच्या आमदार दिलायला लोबो म्हणाल्या की, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मला सांगितले आहे की, सुभाष वेलिंगकर यांना कुठल्याही क्षणी अटक करण्यात येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Job Offer For Indians: 70,000 भारतीयांसाठी 'या' देशात रोजगाराची संधी! नोकरीच्या ऑफर्स पाहून घाई करू नका; सरकारचा इशारा

Vivo ने लॉन्च केला दमदार 5G स्मार्टफोन! 12GB RAM, 256GB स्टोरेजसह तब्बल 9,020mAh बॅटरी; पाहा फीचर्स अन् किंमत

निवृत्तीआधी रोहित शर्मानं पूर्ण करावं 'हे' मोठं टार्गेट; गावस्करांचा हिटमॅनला मोलाचा सल्ला, म्हणाले- "आता जबाबदारी समजून खेळ..."

Broiler Chicken Rates Hike: गोव्यात मासळीनंतर ब्रॉयलर चिकनही महाग, खवय्यांच्या खिशाला मोठी कात्री; किलोमागे दरात 30 ते 40 रुपयांची वाढ

Goa Politics: CM पदाच्या शर्यतीत भंडारींपैकी कोणाचेच नाव नाही! रवी नाईकांनंतर भंडारी समाजात 'मॅग्नेटिक' नेत्याचा दुष्काळ; 2027 च्या निवडणुकीत कुणाचे भवितव्य पणाला?

SCROLL FOR NEXT