Sanskrit Department at Goa University  Dainik Gomantak
गोवा

Goa Universityच्या 'संस्कृत' विभागाची भरारी! संशोधन क्षेत्रात उत्तम कार्य; लवकरच 'पीएचडी’चा प्रस्ताव

Goa Sanskrit Department: गोवा विद्यापीठात सुरू केलेल्या संस्कृत अध्यासनाचे एक सत्र पूर्ण झाले आहे. संस्कृत विभागाने भरारी मारली असून विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी संशोधन क्षेत्रातही उत्तम कार्य करत आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Sanskrit Department at Goa University

पणजी: गोवा विद्यापीठात सुरू केलेल्या संस्कृत अध्यासनाचे एक सत्र पूर्ण झाले आहे. पदव्युत्तर पदवीच्या (एम.ए) पहिल्या सत्राच्या परीक्षा सुरू आहेत. या अध्यासनात एकूण ८ विद्यार्थी शिकत आहेत. संस्कृत विभागाने भरारी मारली असून विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी संशोधन क्षेत्रातही उत्तम कार्य करत आहेत.

येत्या काळात पदवी आणि पदव्युत्तर अशा दोन्ही पदव्यांचा अभ्यासक्रम गोवा विद्यापीठात सुरू करण्याचा विचार असल्याचे संस्कृत अध्यासनाच्या प्रा. डॉ. योगिता छत्रे-केळकर यांनी सांगितले.

संस्कृत विभागात एम.ए.साठी प्रवेश घेतलेल्या तीन विद्यार्थ्यांनी संस्कृतमधून पदवीचे शिक्षण घेतले आहे. इतर विद्यार्थांना संस्कृतच्या प्रेमापोटी प्रवेश घेतला असून पहिल्यांदा त्यांना संस्कृतचे प्राथमिक ज्ञान देण्यात आले. ते विद्यार्थी देखील चांगली प्रगती करत आहेत.

गोवा विद्यापीठात संस्कृतमधून पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवर आयोजित परिषदांमध्ये शोधनिबंधही सादर केले आहेत. संस्कृत साहित्यातील अभ्यासक केंद्रीय संस्कृत विद्यापीठ भोपाळ येथील डॉ. प्रसाद भिडे, चिन्मय आंतरराष्ट्रीय संस्था केरळ येथील डॉ. गौरी माहुलीकर, हैद्राबाद विद्यापीठातील प्रा. अंबा कुलकर्णी, श्री विद्या पाठशाळा डॉ. अपर्णा पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, असे प्रा. छत्रे-केळकर यांनी सांगितले.

‘पीएचडी’चाही प्रस्ताव

गोवा विद्यापीठातील संस्कृत अध्यासनातून आम्ही मोठ्या प्रमाणात भारतीय तत्त्वज्ञान, भारतीय साहित्य, संस्कृत आदीच्या संशोधनाला चालना देण्यासाठी प्रयत्नरत असून त्यासाठी विद्यावाचस्पती (पीएचडी) पदवी संशोधकांना घेता यावी यासाठी आम्ही प्रयत्नरत असल्याचे प्रा. योगिता छत्रे-केळकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Jaipur - Goa Flight: पर्यटकांसाठी खूशखबर! गुलाबी शहरातून गोव्यासाठी सुरु होणार आणखी एक फ्लाईट

Cash For Job Scam: बाबूशचा संताप

दीपश्रीला 14 तर श्रुतीला सहा दिवसांची पोलिस कोठडी; Cash For Job Scam प्रकरणात आणखी खुलासे होणार?

Manohar Parrikar Yuva Scientist Award 2024: कॅन्सरवर संशोधन करणाऱ्या डॉ. जॉली यांना मनोहर पर्रीकर युवा वैज्ञानिक पुरस्कार जाहीर

Goa Fraud: मेरशीतील पॉच बॅग बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला लाखोंचा गंडा; जुने गोवे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल!

SCROLL FOR NEXT