Sanquelim, CM Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

Sanquelim: ..हरवले आभाळ ज्यांचे हो तयांचा सोबती! साखळीतील 'त्या' गरीब महिलेला मिळाला ‘आधार’

Goa CM relief fund: गोकुळवाडी-साखळी येथील शालन नाईक या गरीब महिलेच्या घराची भिंत तसेच घराचा भाग कोसळल्यामुळे तिच्‍यावर मोठे संकट ओढावले होते.

Sameer Panditrao

साखळी: गोकुळवाडी-साखळी येथील शालन नाईक या गरीब महिलेच्या घराची भिंत तसेच घराचा भाग कोसळल्यामुळे तिच्‍यावर मोठे संकट ओढावले होते. त्यांना मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून मदत मिळवून देण्‍यात आली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हा धनादेश नाईक यांच्‍याकडे सुपूर्द केला.

साखळीतील प्रभाग क्र. ६ मधील गोकुळवाडी येथील शालन श्रीकांत नाईक यांच्या घराची भिंत व अर्धा भाग कोसळल्याने त्यांच्यासमोर मोठे संकट उभे राहिले होते. या घटनेची कल्पना स्थानिक नगरसेवक विश्रांती पार्सेकर व माजी नगराध्यक्ष राया पार्सेकर यांना देण्यात आल्यानंतर त्यांनी ता घराची पाहणी केली. तसेच मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून त्यांना मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला.

या आर्थिक साहाय्याचा प्रस्ताव सरकार दरबारी सादर करून आठ ते दहा दिवसांत प्रभावी पाठपुरावा करून मंजुरी मिळविण्यात आली. मदतीचा धनादेश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते शालन नाईक यांना सुपूर्द करण्यात आला. यावेळी त्यांचे पुत्र रितेश नाईक, माजी नगराध्यक्ष राया पार्सेकर यांची उपस्थिती होती. दरम्‍यान, या मदतीबद्दल शालन नाईक यांनी समाधान व्‍यक्त करून मुख्‍यमंत्र्यांचे आभार मानले.

समाजातील गरीब व दुर्बल घटकांसाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधी फायदेशीर ठरत आहे. आतापर्यंत अनेकांनी या निधीचा लाभ घेताना आपल्यावरील संकट काही प्रमाणात दूर करण्यात मदत मिळवली आहे. हे सरकार गरीब व होतकरू लोकांचे आहे. लोकांनी सरकारच्या या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा.

- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Russia Drone Attack: रशियाचा युक्रेनच्या रेल्वे स्टेशनवर भीषण ड्रोन हल्ला; 13 जणांचा मृत्यू तर 10 जखमी, झेलेंस्कींनी व्यक्त केला संताप!

Rajnath Singh: 'पाकिस्तानला लष्करी मदत देणे बंद करा', राजनाथ सिंह यांचा अमेरिकेला स्पष्ट इशारा; एफ-16 पॅकेजला दर्शवला विरोध

Government Job: हिंसक आंदोलनात सहभागी होणाऱ्यांना 'या' सरकारचा मोठा दणका; सरकारी नोकरीसाठी चारित्र्य पडताळणीचा नवा नियम लागू

Budh Gochar 2026: ग्रहांच्या राजकुमाराची बदलली चाल! बुधाच्या कृपेने धनलाभाचा योग; 3 नोव्हेंबरपासून सुरु होणार 'या' 5 राशींचा गोल्डन पिरियड

RBI Plastic Currency: 'आत्मनिर्भर भारता'चे आणखी एक पाऊल! केंद्र सरकारकडून 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटांच्या छपाईला मंजुरी

SCROLL FOR NEXT