Sanquelim New Dainik Gomantak
गोवा

Sanquelim News : सुर्ल येथे घराची भिंत कोसळली; अडीच लाखांचे नुकसान

अडीच लाखांचे नुकसान ः नीलेश सातोडकर कुटुंबीयांवर संकट sanquelim news house collapsed at surlem loss of two half lakhs

गोमन्तक डिजिटल टीम

साखळी मतदारसंघातील जोशीभाट - सुर्ल येथील नीलेश सातोडकर यांच्या राहत्या मातीच्या घराची भिंत भर पावसात कोसळल्याने त्यांच्या कुटुंबावर बेघर होण्याची वेळ आली आहे.

सध्या त्यांची जवळच असलेल्या सरकारी प्राथमिक शाळेच्या वर्गात राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या घटनेत त्यांचे सुमारे अडीच लाखांचे नुकसान झाले.

या घरात नीलेश यांच्यासह पत्नी व दोन मुली राहतात. सुदैवाने या घटनेमुळे कोणालाही इजा झाली नाही, परंतु त्यांना भर पावसात बेघर व्हावे लागले.

या घटनेची डिचोलीचे मामलेदार राजाराम परब यांच्यासह सरपंच विश्रांती सुर्लकर, स्थानिक पंच सदस्य सुभाष फोंडेकर, शाणू सुर्लकर, बाबलो नाटेकर, तलाठी शाबी फोंडेकर यांनी पाहणी केली.

नीलेश सातोडकर यांच्या कोसळलेल्या घरात त्यांनी ठेवलेले सर्व भात पावसाच्या पाण्यामुळे भिजून गेले. त्यामुळे त्यांच्या तोंडचा घास हिरावला गेला आहे. डोक्यावरील छत गेल्याने अनेक समस्या समोर उभ्या राहिल्या आहेत.

मुलांच्या भवितव्याचाही प्रश्न सतावत आहे, असे नीलेश सातोडकर यांच्या पत्नीने सांगितले. तसेच सरकारने आम्हाला मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: काँग्रेस-भाजपमधील शीतयुद्ध

Viral: 8 कोटींचे दागिने घालून नववधू मंडपात; पण व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांची एन्ट्री अन् वराला ठोकल्या बेड्या! नेमकी भानगड काय? Watch Video

Goa Crime: पर्वरी गोळीबाराचा कट उघडकीस येणार? यूपी-मुंबईतील तिघांना अटक; पोलिसांसमोर मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्याचं मोठं आव्हान

Bank Holiday: संप, शनिवार-रविवारची सुट्टी अन्‌ गणेश चतुर्थी! शुक्रवारपासून बँका सलग 5 दिवस बंद; ग्राहकांची होणार गैरसोय

Horoscope: शुक्रवार ठरणार भाग्यवान! 'या' राशींना मिळणार शुभवार्ता; नोकरी, व्यवसायात यशासोबत आर्थिक लाभाचीही शक्यता

SCROLL FOR NEXT