गोवा

साखळीत गोवा सरकारचा डाव फसला

दैनिक गोमन्तक

साखळी: साखळी पालिकेचे (Sanquelim Municipality) नगराध्यक्ष राया पार्सेकर व उपनगराध्यक्ष राजेश सावळ यांना सरकारतर्फे अपात्र करण्याच्या निर्णयाला पंधरा दिवसांची "स्टे आँर्डर" मिळाली असून या निर्णया विरोधात न्यायालयात जाण्याची तयारी साखळी पालिकेतर्फे चालली असून त्यासंदर्भात सर्व कायदेशीर सोपस्कार चालू आहेत. येत्या दोन दिवसात सरकारच्या या निर्णयाविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात येईल अशी माहिती साखळी पालिकेचे नगराध्यक्ष राया पार्सेकर व उपनगराध्यक्ष राजेश सावळ यांनी दिली.

बुधवार दि 20 आँक्टोंबर रोजी दै."गोमन्तक" मधून या संदर्भात वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर साखळीसह संपुर्ण गोमंतकात एकच खळबळ माजली. आधिवेशन काळात केलेली भाजप सरकारची ही कृती हुकुमशाही व अन्यायकारक आहे असा आरोप करुन या कृतीचा साखळी गट तसेच प्रदेश गोवा कॉग्रेस तर्फे निषेध व्यक्त करण्यात आला. यासंदर्भात साखळी पालिकेचे नगराध्यक्ष राया पार्सेकर व उपनगराध्यक्ष राजेश सावळ यांनी दै."गोमन्तक" शी बोलताना सांगितले की सरकारच्या या निर्णयाविरोधात न्यायालयात जाण्याची सर्व प्रक्रिया सुरु असून सर्व कायदेशीर प्रक्रिया झाल्यानंतर दोन दिवसात न्यायालयात सरकारच्या निर्णया विरोधात याचिका दाखल करण्यात येईल.

दरवेळी सरकार विरोधात न्यायालयात विजय - धर्मेश सगलानी

यावेळी बोलताना माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक धर्मेश सगलानी म्हणाले की साखळी पालिका तब्बल दोन वेळा भाजप सरकारच्या विरोधात आपल्या गटातील पँनलने विजय मिळवला.साखळी पालिका लोकशाही मार्गाने जिंकता येत नाही म्हणून बेकायदेशीररित्या साखळी पालिका आपल्या ताब्यात घेण्याचा भाजप सरकारचा कुटील डाव खेळत आहे.दर वेळा आम्ही हा डाव हाणून पाडला आहे. सरकारच्या बेकायदेशीर कृती विरोधात दरवेळी साखळी पालिकेला न्यायालयात जाणे भाग पडला. तब्बल सात वेळा साखळी पालिकेतर्फे भाजप सरकारच्या विरोधात न्यायालयात जाऊन सरकारच्या विरोधात न्यायालयात कायदेशीर विजय मिळवला आहे.

न्यायालयाने अनेक वेळा बेकायदेशीर कृत्याबद्दल सरकारवर ताशेरेही ओढले आहेत तरीही सरकारची मस्ती जात नाही का ? असा सवाल सगलानी यांनी केला.भाजप सरकार असे कृत्य वारंवार करुन साखळी पालिकेच्या विकासाचा खो घालत असून साखळीतील जनता सरकारच्या अशा कृत्याबद्दल संतप्त आहे. येत्या निवडणूकीत साखळीतील जनता याचा वचपा निश्चित काढणार आहे.असे सगलानी म्हणाले. साखळी पालिका नगराध्यक्ष राया पार्सेकर व उपनगराध्यक्ष राजेश सावळ यांना तडकाफडकी अपात्र करणे हे बेकायदेशीर आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधातही आम्ही साखळी पालिका न्यायालयात विजय मिळवू असे सगलानी म्हणाले.

भाजप समर्थक नगरसेवकांविरोधात आपात्रता याचिका

आपल्या सत्ताधारी गटातर्फे भाजप समर्थक नगरसेविका शुभदा सावईकर यांना अपात्र करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. तसेच आणखी दोन भाजप समर्थक नगरसेवकांना अपात्र करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे अशी माहिती सगलानी यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Land Grabbing Case: गोवा जमीन हडप प्रकरण; ईडीची 36 जणांविरोधात मनी लाँड्रिंगची तक्रार

Goa And Kokan Today's Live News: खोर्ली-म्हापसा येथे आढळला पुरुषाचा मृतदेह

SSC Result Sanguem : सांगे तालुक्यात सरकारी शाळांची बाजी; दहावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव

Ponda News : दारूच्या नशेत पर्यटकांची दादागिरी; दाभाळ येथील प्रकार

Dengue News : डेंग्यू निर्मूलनासाठी लोकांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे : आरोग्य उपसंचालक डॉ.कल्पना महात्मे

SCROLL FOR NEXT