Sanquelim Municipal Council Dainik Gomantak
गोवा

Sanquelim Municipal Council: दर सोमवारी साखळी बाजारात वाहतूक बंद; नगरपरिषदेचा मोठा निर्णय

Sanqulim Weekly Market: लोकांची मागणी लक्षात घेऊन स्थानिकांची गैरसोय दूर करण्यासाठी साखळी नगरपरिषदेतर्फे पुढाकार घेण्यात आला आहे

Akshata Chhatre

साखळी: सगळीकडेच आठवडा बाजाराची एक पद्धत आखून दिलेली असते आणि त्याप्रमाणेच दर सोमवारी साखळीत आठवडा बाजार भरतो. पण या आठवडा बाजाराच्या दिवशी साखळी बाजारात होणारी वाहतूक कोंडी आणि परिणामी बाजारात निर्माण होणारा व्यत्यय रोखण्यासाठी नगरपरिषदेकडून चारचाकी व इतर मोठ्या वाहनांची वाहतूक आता बंद केली जाणार आहे.

बाजाराच्या दिवशी संपूर्ण बाजारात लोकांची वर्दळ असतानाच वाढणाऱ्या वाहतुकीमुळे खेळखंडोबा होत असतो आणि त्याचा त्रास बाजारात येणाऱ्या लोकांना होतो. यासाठी लोकांची मागणी लक्षात घेऊन स्थानिकांची गैरसोय दूर करण्यासाठी साखळी नगरपरिषदेतर्फे पुढाकार घेण्यात आला आहे. विर्डीतून बाजारात येणाऱ्या रस्त्यावर फाटक गेट बसवून या रस्त्यावरील वाहतूक म्हावळंगतड मार्गे वळविण्यात येणार आहे तर बाजारातही रस्ता अडवला जाईल.

वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यासाठी नरपरिषदेने आखलेल्या या साच्याचे उल्लंघन झाल्यास मात्र कारवाई केली जाईल याची सर्व वाहनचालकांनी नोंद घ्यावी व बाजार सुरळीत करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्षा सिध्दी प्रभू-पोरोब व उपनगराध्यक्ष आनंद काणेकर यांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT