Sanquelim Vasudev Dainik Gomantak
गोवा

Sanquelim News : दान पावलं...दान पावलं! भल्‍या सकाळी साखळीत अवतरला वासुदेव

गोमन्तक डिजिटल टीम

Sanquelim News : साखळी, ‘‘दान पावलं...दान पावलं...वासुदेवाला दान पावलं...वासुदेव म्हणतो गाणं... आनंदाने करावं दानं...’’ हातातील टाळाचा ठेका धरत असे गाणं गाणारा ‘वासुदेव’ साखळीत अवतरला अन् त्याच्या दर्शनाने साखळीवासीय सुखावले.

दारोदारी आलेल्या वासुदेवाला लोकांनी परंपरेप्रमाणे दान करून आनंद घेतला. आळंदीहून गोव्यात आलेली वासुदेवाची स्वारी सध्या साखळीत दान जमा करण्यासाठी फिरत आहे.

संतकाळात तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही वासुदेव प्रथा होती. दिवाळी, दसरा अशा सणांच्या वेळी वासुदेव दान मागण्यासाठी लोकांच्या घरोघरी येतात. लोकही देवाची भक्ती व सेवा म्हणून या वासुदेवाला भक्तिभावाने दान करतात.

आजच्या पिढीला वासुदेव आणि दान याबाबत जाणीव व्हावी यासाठी सर्वत्र फिरून वासुदेव महत्त्व सांगताना दिसत आहे. दिवाळी, दसरा, वारीच्या वेळी ही वासुदेवाची स्वारी गोव्यातील विविध भागात फिरत असते. संतकाळापासून वासुदेव दारोदारी फिरून दान मागण्याची प्रथा सुरू आहे.

महाराष्‍ट्र, कर्नाटक या राज्‍यांप्रमाणेच गोव्‍यातही पूर्वी भल्‍या पहाटे वासुदेवाचे आगमन व्‍हायचे. लोक त्‍याच्‍या आवाजाने लवकर उठून दर्शन घ्‍यायचे. त्‍याला यथाशक्ती दान द्यायचे. पण अलीकडच्‍या काळात त्‍याचे दर्शन पहाटेऐवजी सकाळचे होऊ लागले आहे.

सकाळचे दर्शन

पूर्वी पहाटे वासुदेव लोकांच्या दारोदारी जायाचा व सूर्य उगवण्याच्या वेळी गावाबाहेर जायचा. पण आताच्या काळात पहाटे पाच वाजता लोक झोपलेले असतात, म्हणून वासुदेव उशिरा म्हणजे सकाळी येतो.

लोक त्याला दान म्हणून तांदूळ, पीठ, धान्य, साखर किंवा पैसे देतात आणि आशीर्वाद घेतात, असे या वासुदेवासह असलेल्या पंडितांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT