Sanquelim  Dainik Gomantak
गोवा

Sanquelim News : सर्वण येथे जलवाहिनी पुन्हा फुटली; लाखो लिटर पाणी वाया

Sanquelim News : दहा दिवसांच्या आत ही जलवाहिनी तिसऱ्यांदा फुटल्याने या जलवाहिनीच्या दुरुस्तीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Sanquelim News :

डिचोली -साखळी मार्गातील गोकुळवाडा-सर्वण येथील जलवाहिनी पुन्हा त्याच ठिकाणी फुटण्याचा प्रकार घडला आहे.

गेल्या दहा दिवसांत ही जलवाहिनी तिसऱ्यांदा फुटली आहे. आज दुपारी पुन्हा एकदा ही जलवाहिनी फुटून पाण्याची पुन्हा नासाडी झाली. सायंकाळपर्यंत पाणी रस्त्यावरून वाहत होते. सायंकाळपर्यंत शेकडो लिटर पाणी वाहून वाया गेले.

आठ दिवसांपूर्वी १७ रोजी ही जलवाहिनी फुटली होती. दुसऱ्या दिवशी पाणी बंद झाले होते. त्यानंतर आठ दिवसांनी गेल्या रविवारी पुन्हा जलवाहिनीत बिघाड निर्माण होताना पुन्हा त्याच ठिकाणी फुटली. पुन्हा एकदा पाणी वाहून फुकट गेले.

दुरुस्तीबाबत प्रश्न चिन्ह

दहा दिवसांच्या आत ही जलवाहिनी तिसऱ्यांदा फुटल्याने या जलवाहिनीच्या दुरुस्तीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

आठ दिवसांपूर्वी पहिल्यांदा ही जलवाहिनी फुटली होती, त्यावेळी जलवाहिनीची दुरुस्ती करण्यात आली होती की तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली होती, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Accident: बेदरकार मिनी बसचालकाने दुचाकीला उडवले! दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू; आके-पॉवरहाऊस मार्गावर भीषण अपघात

Goa Crime: पर्वरी गोळीबार प्रकरणात मोठी कारवाई! दुसरा मुख्य शूटर 'अन्ना' चेन्नईतून गजाआड; आतापर्यंत सहा आरोपी अटकेत

Rahu Gochar 2026: राहु बनवणार अफाट श्रीमंत! 'या' 5 राशींवर होणार पैशांचा पाऊस; राजयोगासारखे मिळणार फळ

Goa Politics: भेटींचा उत्सव, मतांचा ध्यास! गणेश चतुर्थीत राजकीय नेत्यांच्या भेटीगाठींना उधाण; दर्शनासोबत निवडणुकीच्या समीकरणांचीही चर्चा

America Iran War: 6 महिन्यांत 3.21 लाख कोटींची राखरांगोळी, फायटर जेट्स उद्ध्वस्त, अमेरिकन दूतावासांवर हल्ले; पेंटागनच्या ऑडिट रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT