Sanjeel Kudchadkar Kidnapping Case Dainik Gomantak
गोवा

Sanjeel Kudchadkar Kidnapping Case: कौटुंबिक वादातून सुपारी देऊन अपहरण? संजील कुडचडकर प्रकरणात 'सुपारी किलर'चा पर्दाफाश; पोलीस ॲक्शन मोडवर

Sanjeel Kudchadkar Kidnapping Suspect: या प्रकरणी मडगाव पोलिस ठाण्यात संपर्क साधला असता, पोलिसांनी संशयितांबाबत अधिक माहिती देणे टाळले.

दैनिक गोमन्तक डिजिटल

मडगाव:  संजील कुडचडकर अपहरण प्रकरणातील एका संशयितावर खुनाच्या प्रयत्नाचे दोन गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून गुन्हेगारी वृत्तीची पार्श्वभूमी असलेला हा संशयित भाडोत्री गुंड असल्याचे उघड होऊ लागले आहे. या पार्श्‍वभूमीवर या अपहरण प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळण्याची शक्यता आहे.

या अपहरण प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेली कुडचडकर यांची पत्नी लुईझा फर्नांडिस ही अजूनही फरार असून तिच्या शोधासाठी मडगाव पोलिसांचे एक पथक कर्नाटकात तळ ठोकून आहे. गेल्या शुक्रवारी कोंब - मडगाव येथून संजील  यांचे भर दिवसा  सकाळी साडेदहाच्या सुमारास अपहरण झाले होते.   या अपहरण प्रकरणाचे सीसीटीव्ही फुटेज समाज माध्यमांवर व्हायरल झाले होते.

त्याच्या  वीस वर्षीय मुलीने नंतर पोलिसांत तक्रार नोंद केली होती. मागाहून पोलिसांनी कारवार येथून नासिर बिन मसूद व शाह अली सौदागर या दोघांना जेरबंद करून संजीलची सुटका केली होती. अपहरणासाठी वापरलेली कारही पोलिसांनी जप्त केली होती. कौटुंबिक वादातून हे अपहरण घडल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

संशयितांची पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर आज त्यांना पुन्हा न्यायालयात उभे केले असता पाच दिवसांची अतिरिक्त पोलिस कोठडी सुनावण्यात आली.पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नासिर याच्यावर कोलवा पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचे दोन गुन्हे दाखल आहेत. त्याला ‘टायसन’ या टोपण नावानेही ओळखले जाते.

दरम्यान, या प्रकरणी मडगाव पोलिस ठाण्यात संपर्क साधला असता, पोलिसांनी संशयितांबाबत अधिक माहिती देणे टाळले. तपास प्राथमिक अवस्थेत असल्याने व मुख्य सूत्रधार लुईझा या सापडल्या नसल्याने आताच काही गोष्टी उघड करता येत नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

कौंटुंबिक  वादातून अपहरण

जोपर्यंत लुईझा पोलिसांच्या हाती लागत नाही, तोपर्यंत या अपहरणामागील नेमके कारण स्पष्ट होणार नाही, अशीही माहिती पोलिसांनी दिली आहे. कौंटुंबिक  वादातून अपहरणाचे ही  घटना घडली असल्याचे  आतापर्यंतच्या पोलिस तपासात पुढे आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

EPFO कडून पेन्शनधारकांसाठी मोठी खूशखबर! आता घरी बसून जमा करता येणार 'डिजिटल लाईफ सर्टिफिकेट'; जाणून घ्या पद्धत

Abhishek Sharma T20 Record: सिक्सर किंग अभिषेक शर्माची कमाल! पॉवरप्लेमध्ये 100 षटकार मारणारा ठरला जगातील पहिला फलंदाज; रोहित शर्माला सोडले मागे

Donald Trump Iran Jail: डोनाल्ड ट्रम्पला इराणनं तुरुंगात डांबलं? तेहरानमधील व्हायरल व्हिडिओनं जगात खळबळ; अमेरिकेच्या दादागिरीला चोख प्रत्युत्तर VIDEO

Codli Iron Ore Mine: कोडली खाण पुन्हा सुरू करण्यावर संमिश्र प्रतिक्रिया; रोजगाराची आशा, पण पाणी, शेती आणि प्रदूषणाची गंभीर चिंता

Made In India Smartphone Brand: ॲपल-सॅमसंगला देणार टक्कर! भारत 2028 पर्यंत लॉन्च करणार स्वतःचा स्मार्टफोन ब्रँड; केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT