Shiv Sena in Goa Dainik gomantak
गोवा

संजय राऊतांची गोवा भाजपवर सडकून टीका, म्हणाले, भाजप सरकार माफीयांचे..

शिवसेना गोव्यात बदल घडवून सामान्य जनतेला न्याय देणार

दैनिक गोमन्तक

गोव्यातील भाजप सरकार माफीयाचे सरकार होते. येथील नेतेमंडळी भ्रष्टाचारी असल्याने त्यांचा पराभव येत्या विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) गोव्यातील जनता निश्चित करणार असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे नेते तथा राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले. वास्को मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार मारुती गणपती शिरगावकर यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन शिवसेना प्रमुख गोवा प्रभारी तथा राज्य सभा खासदार संजय राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी त्यांच्या समवेत जीवन कामत, थॉमस सावंत, आदेश परब, शांताराम मसुरकर, प्रकाश सादिए, नवनाथ नाईक व इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुढे बोलताना शिवसेनेना नेते राऊत म्हणाले की गोव्यातील भाजप (BJP) सरकारने भ्रष्टाचार (Corruption) माजवून माफिया राज येथे चालवले होते. यामुळे येथील जनता आर्थिक रित्या कमजोर व रोजगार विना राहिलेली आहे.

गोव्यात (goa) शिवसेनेने अकरा मतदारसंघात उमेदवार रिंगणात उतरवले असून त्यांचा विजय निश्चित आहे. वास्कोचे शिवसेनेचे उमेदवार मारुती शिरगावकर हे गरीब कुटुंबातली असून ते सर्व धर्मियांना घेऊन कार्य करणारे आहेत. तसेच सामान्य जनतेचे प्रश्न विधानसभेत मांडणारे आहे. शिवसेना गोव्यात बदल घडवून सामान्य जनतेला न्याय देणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली.

वास्को (Vasco) शिवसेना उमेदवार मारुती शिरगावकर यांनी सांगितले की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत वास्को मतदारसंघातील जनतेला शिवसेनेमुळे बदल मिळणार आहे. जनता भाजपला त्याची योग्य जागा दाखवणार असल्याने शिवसेनेचा विजय वास्को बरोबर गोव्यात अवश्य होणार असल्याची माहिती शिरगावकर यांनी दिली.

भरारी पथकाकडून शिवसेनेवर कारवाई

शिवसेना (Shiv Sena) नेते संजय राऊत वास्को शिवसेनेचे उमेदवार प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी येणार म्हणून शेकडो शिवसैनिकांनी कार्यालयासमोर गर्दी केली होती. संजय राऊत यांनी कार्यालयाचे उद्घाटन केल्यानंतर मुरगाव तालुका वास्को भरारी पथकांचे समीर सावंत व विक्टर बारबोझा यांनी पोलिस (police) फौज फाट्यासह कार्यालयात येऊन आचार संहितेचा भंग केल्याप्रकरणी मारुती शिरगावकर यांना मोठे फलक काढण्याचा इशारा दिला.

यावेळी संजय राऊत कार्यालयात होते व त्यांच्या समवेत महाराष्ट्राचे शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. बाहेरील प्रकरण त्यांच्या नजरेस आले नसल्याने प्रकरण हाताळण्यास शिवसैनिकांना यश आले. सदर भरारी पथकांनी पोलिसांनी कारवाई करून मोठे फलक काढायला लावले. तर कार्यकर्त्यांना खाण्यासाठी आणलेले सामोसा मात्र ताब्यात घेतले. त्यामुळे शिवसेना कार्यकर्ते भरारी पथकावर नाराज झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

SCROLL FOR NEXT