Potholes|Sanjay Barde  Dainik Gomantak
गोवा

Mapusa Roads: हेल्पलाईनवर खड्ड्यांचा फोटो पाठवा, स्वखर्चाने खड्डे बुजवणार; सामाजिक कार्यकर्ते संजय बर्डेंचा पुढाकार

Bad Roads In Mapusa: चतुर्थीच्या काळात लोकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते संजय बर्डे पुढे सरसावले आहेत

गोमन्तक डिजिटल टीम

म्हापसा : शहरात भूमिगत वीज वाहिनीच्या कामामुळे ठिकठिकाणी रस्ते खोदले होते. मात्र, जिथे कामे पूर्णत्वास आली, तेथील रस्ते पूर्ववत केले नाहीत. परिणामी, खड्ड्यांमुळे लोकांना दररोज तारेवरची कसरत करावी लागत असून चार दिवसांवर गणेशोत्सव आला आहे. चतुर्थीच्या काळात लोकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते संजय बर्डे पुढे सरसावले आहेत. संजय बर्डेंनी म्हापसेकरांसाठी ‘रस्ता हेल्पलाईन क्रमांक’ जारी केला आहे.

या हेल्पलाईनवर खड्ड्यांचा फोटो व माहिती पाठवावी. यावेळी संजय बर्डे हे स्वखर्चाने खड्डे बुजविणार असल्याचे त्यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत जाहीर केले. यावेळी सीतेश मोरे, विनेश नाईक, सुरज कांबळी हे उपस्थित होते.

आमदारांना दिसेना लोकांचा त्रास!

म्हापसा मतदारसंघाच्या आमदारांना देखील लोकांना होणारा त्रास दिसत नाही. त्यामुळे मी स्वखर्चाने रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ज्या परिसरात गणेश विसर्जन केले जाते, त्या भागांतील रस्त्यांवरील खड्डे पहिल्यांदा बुजविले जातील. तसेच लोकांच्या तक्रारीनुसार रस्त्यांवरील खड्डे बुजविले जातील, असेही बर्डे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT