MAPUSA MUNICIPAL COUNCIL Gomantak Digital Team
गोवा

Mapusa News : म्हापसा पालिकेतील 120 फाईल्स गायब; बर्डेंचा आरोप

म्हापसा पालिकेतील कारभार रामभरोसे

दैनिक गोमन्तक डिजिटल

येथील नगरपालिकेतील प्रशासकीय कारभार हा रामभरोसे चालू असल्याची टीका संजय बर्डे यांनी केली. ते म्हणाले की, म्हापसा पालिका कार्यालयातील फाईल्स या गहाळ होत आहेत. अशा जवळपास 120 फाईल्स कथितरित्या आपोआप गायब झाल्या आहेत. त्याशिवाय काही नगरसेवक पालिकेत परवानगीसाठी आलेल्या फाईल्स घरी नेतात. हे कायद्यास धरून आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

शुक्रवारी, म्हापशात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अनिक केरकर, राजन धारगळकर व सितेश मोरे हे उपस्थित होते.

बर्डे म्हणाले की, पालिका कार्यालयातील अधिकारी व अभियंत्यांच्या सुस्त कारभारामुळे फाईल्स गायब होताहेत. तर, काही आरटीआय कार्यकर्ते परस्पर मुख्याधिकाऱ्यांची स्वाक्षरी करून पत्र पाठवताहेत. यातून पालिकेतील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

त्याचप्रमाणे, हल्लीच पालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम राबविली आहे. सिने अलंकार थिएटरनजीक असलेल्या व्यावसायिकांना पालिकेकडून लक्ष्य केले जात आहे. मुळात कित्येक वर्षे हे व्यावसायिक इथे राबताहेत. रात्रीच्या वेळी सिने अलंकार थिएटरनजीक रस्त्यावर वाहतुकीची वर्दळ नसते. त्यामुळे तिथे या व्यावसायिकांनी मेज किंवा टेबल थाटल्यास हरकत घेण्यासारखे काहीच नाही.

दरम्यान, म्हापसा पालिका ही फक्त लहान व्यावसायिकांना लक्ष्य करीत आहे. तर भाजपाच्या जवळील किंवा इतर मोठ्या व्यावसायिकांना ते टार्गेट करीत नाहीत, असा आरोप संजय बर्डेंनी यावेळी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'आप'ला लक्ष्य करण्यासाठीच 'ईडी'चे छापे, भाजपाकडून पक्षाच्या नेत्यांना घाबरवण्याचा प्रयत्न; वाल्मिकी नाईक यांची टीका

Goa Politics: वीरेश यांची पुन्हा चर्चेकडे पाठ! गोव्याबाहेर असल्याचे दिले कारण, कार्यकर्त्यांत संभ्रम

खरी कुजबूज: नाकर्ते वीज खाते

Goa Politics: तुम्हीच वेळ ठरवून बैठकीला हजर रहा! परब यांचे नमते, वीरेशना संयत आवाहन

Goa Monsoon Preparedness: 9 मिनिटांत आपत्काल मदत! मुख्यमंत्र्यांकडून मान्सूनपूर्व तयारीचा आढावा, 172 कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

SCROLL FOR NEXT