Sanguem Review of pre-monsoon works Dainik Gomantak
गोवा

Sanguem News : मंत्री सुभाष फळदेसाईंकडून सांगेत मॉन्सूनपूर्व कामांचा आढावा

सांगे भागातील मॉन्सूनपूर्व कामे त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश

दैनिक गोमन्तक डिजिटल

समाजकल्याण मंत्री तथा सांगेचे आमदार सुभाष फळदेसाई यांच्या अध्यक्षतेखाली आज जलस्रोत, अग्निशमन विभाग, आरोग्य विभाग, सार्वजनिक बांध (पाणी विभाग) आणि आणि इतर संबंधित खात्यांच्या अधिकाऱ्यांबरोबर मॉन्सूनपूर्व कामांचा आढावा घेण्यासाठी पालिका सभागृहात बैठक झाली.

यावेळी सांगेच्या नगराध्यक्षा प्रीती नाईक व इतर नगरसेवक हजर होते. गेल्या सोमवारी वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे बऱ्याच ठिकाणी झाडे वीज तारांवर पडल्याने वीज खांब व तारा तुटल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता. यावरून वीज खात्याच्या कामाविषयी लोकांनी संशय घेतला होता.

सध्या पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपल्याने सांगे भागातील मॉन्सूनपूर्व कामे त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी फळदेसाई यांनी संबंधित खात्यांच्या अधिकाऱ्यांना दिले. पावसाच्या पाण्याचा निचरा व्यवस्थित होण्यासाठी सर्व गटारांची सफाई करावी तसेच धोकादायक झाडे वेळीच कापून टाकावीत, असे त्यांनी सांगितले.

गेल्यावर्षी अनेक ठिकाणी पुरसदृश स्थिती उद्‍भवली होती, अशा ठिकाणी यावर्षी जबाबदारी घ्यावी तसेच काही विपरीत घटना घडल्यास त्याला सामोरे जाण्यासाठी तयारीनिशी सज्ज रहावे, असे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT