Local Residents Dainik Gomantak
गोवा

‘खासगी जमिनीं’वरून लोक आक्रमक; खिणमधील प्रकार

रिवणमधील प्रकार : रिझर्व्ह फॉरेस्टमध्ये नोंद करण्याचा वन खात्याचा प्रयत्न

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Police : सांगेतील रिवण पंचायतीमधील दानोळे भागातील लोकांच्या खासगी जमिनी रिझर्व्ह फॉरेस्टमध्ये नोंद करण्याचा प्रयत्न वन खात्याने चालविल्याने स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. याविरोधात स्थानिक एकवटले आहेत. सरकारने यावर तोडगा काढण्याची मागणीही स्थानिकांकडून करण्यात आली आहे.

सविस्तर माहितीनुसार, रिवण पंचायत भागातील दानोळे या प्रभागातील शेकडो वर्षांपासून पूर्वजांनी राखून ठेवलेल्या व विकसित केलेल्या जमिनी वन खाते राखीव वनक्षेत्र म्हणून ताब्यात घेताना कष्टकरी लोकांना जमिनीत जाण्यासाठी हरकत घेऊ लागले आहे.

आपल्या जमिनीसभोवताली लाकडी कुंपण घातल्यासही वन खात्याकडून कोणतीही चौकशी न करता मोडून टाकण्याचा प्रकार घडू लागल्याने कष्टकरी समाजात तीव्र संताप व्यक्त केला जाऊ लागला आहे. या भागातील श्री दक्षणा मातेचे मंदिरही राखीव वन क्षेत्रात समाविष्ट करतील म्हणून लोकांत अधिकच संताप निर्माण होऊ लागला आहे. याचे पडसाद आता सांगे भागात उमटणार असल्याचे चिन्ह दिसू लागले आहे.

मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे

स्थानिक पंचायत आणि आमदारांच्या कानावर ही गोष्ट घालूनही काहीच उपाययोजना केली जात नसल्याची खंत आनंद गावकर यांनी व्यक्त केली आहे. म्हणून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यात लक्ष घालून कष्टकरी समाजाला न्याय देण्याची विनंती करण्यात आली आहे. कष्टकरी समाजाला न्याय मिळविण्यासाठी प्रत्येक वेळी आंदोलन करावे लागते, ही दुर्दैवाची बाब असल्याचे गावकर म्हणाले.

धार्मिक मुद्दाही ऐरणीवर

सर्व्हे क्र. 110/1 ते 110/41 या जमिनी स्थानिक लोकांच्या आहेत. पैकी सर्व्हे क्र. 110/39 या जमिनीवर श्री दक्षणा देवीचे मंदिर आहे. ती जमीनसुद्धा राखीव वन क्षेत्रात असल्याचे वन खात्याचे म्हणणे आहे. भविष्यात श्री दक्षणा देवीच्या मंदिराचे नूतनीकरण करायला गेल्यास वन खाते अशाच प्रकारे अटकाव करणार असल्याने हा धार्मिक मुद्दाही ऐरणीवर येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ganesh Festival In Goa: गोव्यात 1961 नंतर सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात, आज प्रत्येक गल्लीबोळात पाहायला मिळतो बाप्पाचा जल्लोष

खरी कुजबुज: गावडे पर्यायाच्‍या शोधात!

Ganesh Chaturthi 2025: बाप्पाच्या स्वागतासाठी सज्ज व्हा! मूर्ती स्थापनेचे नियम आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या

Goa Konkani Academy: गोवा कोकणी अकादमीच्या योजनांसाठी मुदतवाढ, आता 'या' तारखेपर्यंत करता येणार अर्ज

"मी चर्चमध्ये जाणं सोडलं; माझा हरवलेला सन्मान कोण परत देणार?" निर्दोष सुटल्यानंतर माविन नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT