Subhash Phaldesai Dainik Gomantak
गोवा

Sanguem: इको सेन्सिटिव्ह झोनला नागरिकांचा विरोध; मंत्री फळदेसाईंचाही पाठींबा

गावकऱ्यांच्या उपजीविकेचा प्रश्न ऐरणीवर; अन्यथा आंदोलन करु

दैनिक गोमन्तक

केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार गोव्यातील 99 गावे इको-सेन्सिटिव्ह झोन (Eco Sensitive Zone) म्हणून घोषित करण्याचे प्रस्तावित आहे. यामध्ये सांगेचा ही समावेश होणार असल्याने सांगे नागरीकांनी याला विरोध दर्शवत आंदोलनाचा इशारा दिला आहे. याचे समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी ही समर्थन केले आहे.

(Sanguem MLA subhash Phal Dessai backs stir against eco-sensitive zone)

याबाबत बोलताना मंत्री फळदेसाई म्हणाले की, या मसुद्याच्या अधिसूचनेमुळे ज्यांचे जीवन आणि उपजीविका धोक्यात आली आहे. त्या सांगेच्या गावकऱ्यांना पाठिंबा देत आहे. हा मसुदा अधिसूचनेबाबत सरकारने स्थानिकांच्या समस्या दूर न केल्यास आंदोलनाचे शस्त्र वापरु असा इशारा ही त्यांनी दिला.

केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचा मसुद्यानुसार म्हादई, नेत्रावळी, कोटीगाव, भगवान महावीर आणि बोंडला वन्यजीव अभयारण्य यांचा संवेदनशील क्षेत्रात समावेश करण्याचा प्रस्ताव आहे. यामध्ये प्रामुख्याने खाणकाम, लाल श्रेणीचे प्रदूषण करणारे उद्योग, इमारत, बांधकाम आणि क्षेत्र विकास प्रकल्प याला पर्यावरण-संवेदनशील क्षेत्रात प्रतिबंधित असेल. त्यामुळे या क्षेत्रात असे व्यवसाय करता येणार नाहीत.

फळदेसाई म्हणाले की, नेत्रावळी गावाला वन्यजीव अभयारण्य घोषित केल्यास सांगेला याचा मोठा धक्का बसणार आहे. तसेच नेत्रावळीच्या जंगलात शतकानुशतके स्थायिक असणाऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा कसा करायचा? असा सवाल ही त्यांनी यावेळी केला. आपण या विषयाकडे राज्यपालांचे लक्ष वेधणार आहोत. “त्यांनी मसुदा अधिसूचनेला अंतिम रूप देण्यापूर्वी सामन्यांच्या समस्या सोडवणे अपेक्षित आहे. अन्यथा हा गावकऱ्यांवर अन्याय होईल,” असे ही ते यावेळी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"आम्ही आणि पाकिस्तानी सैन्य एकच!" लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवादी सैफुल्लाह कसूरीची मोठी कबुली; भारताविरुद्ध पुन्हा ओकली गरळ

"...म्हणून गोवा बर्बाद" राज ठाकरेंनी मांडलं जमिनींच्या लुटीचं 'डिजिटल' गणित; महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत रील्सस्टार्सना लगावला टोला

Goa Tourism: गोव्याचा पर्यटनात जागतिक डंका! 2025 मध्ये 1 कोटी 8 लाख पर्यटकांनी दिली भेट

IND vs NZ: ऋषभ पंतच्या जागी 'या' युवा खेळाडूची संघात एन्ट्री, 'BCCI'ने केली घोषणा

Goa Politics: गोव्यात 'आप'ची नवी टीम जाहीर! वाल्मिकी नाईक प्रदेशाध्यक्ष, तर गर्सन गोम्स कार्यकारी अध्यक्ष

SCROLL FOR NEXT