Sanguem school accident news Dainik Gomantak
गोवा

Sanguem: सिलिंग नेमके कशामुळे कोसळले? माकड की कामकाजातील त्रुटी; ‘त्या’ विद्यार्थिनीला मिळाला डिस्‍चार्ज

Sanguem school accident news: सांगे येथील सरकारी उच्‍च माध्‍यमिक विद्यालयाच्‍या इमारतीच्‍या सभागृहाचे सिलिंग कोसळल्‍याने एका विद्यार्थीनीला हॉस्‍पिसियो इस्‍पितळात दाखल करण्‍यात आले होते.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: सांगे येथील सरकारी उच्‍च माध्‍यमिक विद्यालयाच्‍या इमारतीच्‍या सभागृहाचे सिलिंग कोसळल्‍याने एका विद्यार्थीनीला हॉस्‍पिसियो इस्‍पितळात दाखल करण्‍यात आले होते. तिची प्रकृती ठिक झाल्याने शनिवारी तिला ‘डिस्‍चार्ज’ देण्‍यात आला. दुसरीकडे, शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी आज सांगे येथे जाऊन उच्‍च माध्‍यमिक विद्यालय इमारतीची पाहणी केली.

शाळेच्या सुरक्षेसंदर्भात अहवाल तयार करुन तो सरकारला पाठविला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. या इमारतीचे छत आणि मधले सिलिंग यामध्‍ये काही प्रमाणात मोकळी जागा असल्‍याने माकड तिथे आत शिरले आणि माकडाच्‍या वजनामुळे हे सिलिंग खाली काेसळले, असेही ते म्हणाले.

त्‍यामुळे छत आणि सिलिंग यामधील मोकळी जागा कशापद्धतीने बंद करायची यावर वेगवेगळ्‍या सूचना आल्‍या आहेत. मात्र या विद्यालयाची इमारत जंगली भागाशी जवळ असल्‍याने इतर प्रकारचीही जनावरे या जागेत येऊ शकतात.

ही शक्‍यता गृहित धरुन या जागेला मोठे कुंपण घालता येईल का, यावरही विचार चालू आहे. सोमवारी यासंदर्भात आराखडा तयार करण्‍यासाठी आणखी एक बैठक घेण्‍यात येईल, असे झिंगडे यांनी सांगितले. दरम्यान, विद्यालयाचे प्राचार्य सुदेश नाईक यांनी सांगितले की, आज या विद्यार्थिनीला डिस्‍चार्ज देण्यात आला आहे.

म्हणून घडली घटना

पंखा वर लावताना जी सुरक्षेसाठी पीन लावणे आवश्यक होती ती न लावल्‍याने ही दुर्घटना घडली, असे प्राथमिक चौकशीत पुढे आले आहे. तीन महिन्‍यापूर्वीच या शाळेत दुरुस्‍तीचे काम केले होते. कदाचित घाईघाईत हे काम केल्‍यामुळे या काही त्रुटी राहिल्‍या असतील मात्र याही संदर्भात चौकशी केली जाईल, असे झिंगडे यांनी यावेळी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rama Kankonkar: "रामाच्या तोंणान ही उतरां घातली कोणें?", 23 दिवस शांत, मग अचानक काय झालं? आरोपांवर खवंटेंचा पलटवार

Jasprit Bumrah: 50व्या कसोटीत बुमराहचा 'किलर' यॉर्कर! विंडीजचा फलंदाज हतबल, स्टंप्स आऊट ऑफ द पार्क Watch Video

50 वर्षांची परंपरा! हनुमान नाट्यगृहचे नूतनीकरण, कलेला मिळणार मोठे व्यासपीठ; CM सावंतांच्या हस्ते उद्घाटन

‘ऑपरेशन ब्लू स्टार’ ही मोठी चूक, इंदिरा गांधींना त्याची किंमत जीव देऊन चुकवावी लागली: पी. चिदंबरम यांच्या वक्तव्याने खळबळ VIDEO

Opinion: गाय काय देते?

SCROLL FOR NEXT