Sanguem protest Dainik Gomantak
गोवा

Sanguem: सांगे आयआयटीला विरोध सुरुच; नागरिक संतापले

कृषी मंत्री रवी नाईक यांनी दिली भेट देत केली पाहणी

दैनिक गोमन्तक

गेले काही दिवस सांगे येथे आयआयटी उभारणीला नागरिकांनी विरोध सुरु केला असून दुसऱ्या बाजूला राज्यशासनाने नागरिकांना समजावत हा प्रकल्प होणारच अशी भुमिका घेतली आहे. त्यामूळे हा प्रश्न आता चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

(Sanguem farmers opposes to iit project)

नुकतीच राज्याचे कृषी मंत्री रवी नाईक यांनी सांगे येथे पाहणी केली. नाईक यांनी आयटीला विरोध करणाऱ्या नागरिकांना भेट देणार असल्याचं म्हटलं होतं. मात्र नाईक पाहणी करत असताना यावेळी नागरिक एकत्र जमू लागले. आणि जोरदार घोषणा देण्यास सुरुवात केली. हा प्रकल्प पुर्ण झाल्यास आपल्याकडे असलेल्या परंपरागत जमिनी हिरावल्या जातील अशी भिती नागरिकांनी यावेळी व्यक्त केली.

सांगे आयआयटी पायाभरणी येत्या 6 महिन्यात - मुख्यमंत्री

सांगेतील प्रस्तावित आयआयटी प्रकल्पाची पायाभरणी 6 महिन्यात करणार असल्याचं वक्तव्य दोन दिवसांपुर्वी म्हणजे 5 आक्टोबर रोजी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केलं. एका जाहीर कार्यक्रमात त्यांनी सांगे आयआयटीला विरोध करणाऱ्यांचाही पुरता समाचार घेतला. या प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून विविध व्यवसायांना चालना मिळणार असल्याचा विश्वासही व्यक्त केला.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी येत्या सहा महिन्याच्या आत आयआयटीचीही पायाभरणी केली जाणार असल्याची घोषणा केली आहे. या प्रस्तावित आयआयटी तसेच गोव्यात येणाऱ्या इतर प्रकल्पात स्थानिकांना प्राधान्य दिले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामूळे गोवा सरकार नागरिकांच्या विरोधाला महत्त्व देणार की, हा प्रकल्प पुर्ण करणार हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT