Court  Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: सांगे लैंगिक अत्‍याचार प्रकरण मडगाव सत्र न्‍यायालयात वर्ग

Goa Crime News: दाबामळ सांगे येथे एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेले प्रकरण सांगे न्यायालयाने मडगावच्या सत्र न्यायालयात वर्ग करण्याचा आदेश दिला.

दैनिक गोमन्तक

Goa Crime News: दाबामळ सांगे येथे एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेले प्रकरण सांगे न्यायालयाने मडगावच्या सत्र न्यायालयात वर्ग करण्याचा आदेश दिला. शेळपे -सांगे येथे एका कंपनीत नोकरीला असलेल्या श्याम मुकुंद देविदास (४२) हा या प्रकरणातील संशयित आहे.

सांगे न्यायालयाच्या न्या. अनुशा कायसुवकर यांच्या न्यायालयाने हा आदेश दिला. सरकारपक्षातर्फे सरकारी वकील ए. चिमुलकर यांनी काम पाहिले. या प्रकरणातील संशयिताला कोलवाळ मध्यवर्ती तुरुंगातून न्यायालयात आणण्यात आले होते. हा आदेश दिल्यानंतर या संशयिताला पुन्हा कोलवाळ येथील तुरुंगात नेण्यात आले.

न्यायालयात सादर करण्यात आलेल्या आरोपपत्रानुसार लैंगिक अत्याचाराची ही घटना 18जुलै रोजी सायंकाळी 5.30 च्या सुमाराला घडली होती. पीडित युवती आपल्या घरी परतत असताना संशयिताने तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. संशयिताने तिला मारहाण केली आणि विरोध न करण्याची धमकी दिली. संशयिताने तिचे कपडे फाडले, असे न्यायालयात सादर करण्यात आलेल्या आरोपपत्रात म्हटलेले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT