Sand Mining Dainik Gomantak
गोवा

Sand Erosion: सासष्टी तालुक्यात वाळू उपसा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

सेरनाबाती समुद्रकिनाऱ्यालगत पडले मोठे खड्डे

Sumit Tambekar

राज्यात वाळू उपशाला बंदी असताना काही ठिकाणी ती सऱ्हास सुरु असल्याचे दोन दिवसांपूर्वी कुडचडे येथे रेती कामगाराची हत्येतून स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर सासष्टी तालुक्यातील वाळू उपसा समस्या पुन्हा ऐरणीवर आल्याचे चित्र आहे.

(Sand erosion haunting Salcete villagers)

सासष्टी तालुक्यातील वाळू उपशाची प्रकरणे आता वेगाने वाढू लागली आहेत. तसेच सासष्टी तालुक्यातील गावकऱ्यांना समुद्रकिनाऱ्यालगतच्या भागात पुन्हा एकदा वाळू उपसासारख्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. मिळालेल्या माहितीनुसार समुद्राच्या पाण्याच्या वाढत्या पातळीमुळे ही सेरनाबाती समुद्रकिनाऱ्यावर तसेच तालुक्यातील किनारपट्टीवरील इतर ठिकाणी वाळू वाहून जात आहे. ज्याच्यामूळे ठिक - ठिकाणी खोल खड्डे दिसू लागले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार सेरनाबाती समुद्रकिनाऱ्यावर पावसाळ्यासाठी हॉटेल आणि शॅक बंद करण्यात आलेले आहेत. याच शॅकजवळ आता दोन ठिकाणी धूप झाल्यामुळे वाळूचे खोल 'खड्डे' तयार झाले आहेत.

त्यामूळे यापूढे हॉटेल आणि शॅकला पुन्हा सुरु करण्यासाठी काय करावे हा प्रश्न असणार आहे. पडत असलेले खडे हे पाण्याची वाढती पातळी, विशेषत: भरती-ओहोटीच्या वेळी, वाळूची धूप होत आहे. याच स्थितीत या समस्या निर्माण होत आहेत. असे परिसरातील स्थानिकांचे म्हणणे आहे.

कुडचडे येथे रेती कामगाराची हत्या

कुडचडे येथे रेती कामगारांवर दोन दिवसांपूर्वी गोळीबार करत हत्या झाली आहे. या प्रकरणांची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावून झाडाझडती केली. मात्र यावर विरोधी पक्षांनी राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे.

रेती उत्खनन कामाचे नियमन करण्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारचे अपयश आणि बेकायदा रेती व्यवसायाला दिलेले प्रोत्साहन यामुळेच कुडचडेत गोळीबाराची घटना घडली आहे. कुडचडे येथे बंदुकीच्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे, त्याला सरकारच जबाबदार आहे असा सनसनाटी आरोप काँग्रेसचे कार्याध्यक्ष आणि कुंकळ्ळीचे आमदार आमदार युरी आलेमाव यांनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT