Sancoale Panchayat Dainik Gomantak
गोवा

Sancoale Panchayat: सांकवाळ पंचायतीत सत्तांतर नाट्य, डाव फसला; सरपंच, उपसरपंचांवर अविश्‍वास मंजूर

Sancoale Deputy Sarpanch ousted: एका नाट्यमय घडामोडीनंतर सांकवाळ पंचायतीच्या सरपंच अनुषा लमाणी व उपसरपंच डेरेक वालिस यांच्याविरोधी दाखल अविश्र्वास ठराव सात विरुध्द शून्य मतांनी संमत झाला.

गोमंतक ऑनलाईन टीम

कुठ्ठाळी/वास्को: एका नाट्यमय घडामोडीनंतर सांकवाळ पंचायतीच्या सरपंच अनुषा लमाणी व उपसरपंच डेरेक वालिस यांच्याविरोधी दाखल अविश्र्वास ठराव सात विरुध्द शून्य मतांनी संमत झाला. सदर बैठक होऊ नये यासाठी आखलेला डाव फसल्याची चर्चा बैठकीनंतर होत होती.

सरपंच व उपसरपंचांनी अविश्र्वास ठराव दाखल होताच चार दिवसांपूर्वी आपल्या पदांचा राजीनामा दिला होता. तथापि बीडीओंनी काढलेल्या नोटीशीनुसार खास बैठक सोमवारी (ता.१३)घेण्यात आल्यावर चर्चेअंती ठराव संमत झाला.

या बैठकीला चार पंच सदस्य हजर राहिले नाहीत. ग्रामसेवक अमोल तिळवे यांची बदली झाल्याने त्यांनी ग्रामसचिव योगेश फातर्पेकर यांच्याकडे सांकवाळ पंचायतीचा ताबा न दिल्याने पेच निर्माण झाला होता. त्यामुळे बीडीओ ई.डिकॉस्ता यांना नव्याने आदेश काढून बैठकीची प्रक्रिया पार पाडावी लागली. सदर बैठक होऊ नये यासाठी डावपेच आखण्यात आले होते, तथापि ते डावपेच यशस्वी झाले नसल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त झाल्या.

सांकवाळचे सरपंच अनुषा लमाणी व उपसरपंच डेरेक वालिस यांच्या विरोधात अकरा पैकी सहा सदस्यांनी ३० मार्चला अविश्र्वास ठरावाची नोटीस दिली होती. त्यानुसार बीडीओंच्या निर्देशानुसार ग्रामसेवक अमोल तिळवे यांनी १३ रोजी नोटीशीवर चर्चेसाठी खास बैठक बोलाविली होती. परंतु ९ रोजी पंचायत संचालक महादेव आरोंदेकर यांनी एका आदेशान्वये अमोल तिळवे यांची मार्जोड्यात तर मार्जोडाचे ग्रामसचिव योगेश फातर्पेकर यांची सांकवाळ पंचायतीत बदली केली.

तिळवे यांनी १० रोजी सदर ताबा दिला नाही. त्यानंतर शनिवार व रविवार आल्याने सोमवारी(ता. १३) सकाळी लवकर येऊन ताबा देणे अपेक्षित होते. ग्रामसचिव फातर्पेकर हे सांकवाळ पंचायतीत तिळवे यांची वाट पाहत होते.

तसेच खास बैठक सकाळी १०.३० वा. बोलावल्याने अविश्र्वास ठराव आणणारे तुळशीदास नाईक, निधी नाईक, रोहिणी तोरस्कर, व्हॅलेन्टो रॉड्रिग्ज, जासिया काद, मारिया आझावेदो, मौरेलिओ कार्व्हालो हे सात सदस्य हजर होते. वेळेत बैठक सुरू न झाल्याने संबंधितांनी विचारणा केली. तेव्हा तिळवेंनी पदाचा ताबा फातर्पेकर यांच्याकडे दिला नसल्याचे झाले. त्यामुळे तांत्रिक पेच निर्माण झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: बुध अन् शुक्राचे महागोचर! 11 जूनला पालटणार 3 राशींचं नशीब; गुंतवणुकीतून मिळणार दुप्पट परतावा

खरी कुजबुज: मनोज उत्तर कर्नाटक संघर्ष सेनेच्‍या संपर्कात

Goa Politics: आमदार वीरेश बोरकर मांडणार भूमिका? पक्षातील अंतर्गत वाद आणि मनोज परब यांच्‍याबाबत काय बोलणार?

Pakistan Bus Accident: एक्सप्रेसवेवर काळाचा थरार, दोन बसेसची जोरदार धडक! पाकिस्तानात भीषण अपघात; 17 प्रवाशांचा मृत्यू, 5 जण गंभीर जखमी

Vaibhav Sooryavanshi: 50 चेंडूंचे चॅलेंज 25 चेंडूंतच संपवले! वैभव सूर्यवंशीचे मैदानावर वादळ, ठोकलं शानदार शतक Watch Video

SCROLL FOR NEXT