Sanquelim Goa Dainik Gomantak
गोवा

Sanquelim Goa: साखळी रस्त्यावर दरड कोसळण्याची भीती; पावसाळ्यापूर्वी उपाययोजना करण्याची मागणी

Sanquelim Goa: गेल्या वर्षी पावसाळ्यात याच ठिकाणी तसेच वजरी गावात जाणाऱ्या रस्त्याच्या जंक्शनला लागूनच एका ठिकाणी दरड माती रस्त्यावर आली होती.

गोमन्तक डिजिटल टीम

Sanquelim Goa

साखळी ते विर्डी या रस्त्यावर माकरशेणो या भागात रस्त्याच्या बाजूला असलेले डोंगर ठिसूळ बनल्याने ती दरड माती रस्त्यावर कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. गेल्या वर्षीही या ढिगाऱ्याची माती काही प्रमाणात पावसाच्या पाण्यामुळे रस्त्यावर आली होती.

विर्डी ते आमोणा पूल झाल्यानंतर विर्डी ते साखळी या रस्त्यावर वाहतूक वाढली आहे. विर्डी गावातून अवजड वाहनांंना बंदी असली तरी चारचाकी व दुचाकी वाहनांची मोठी रहदारी या रस्त्यावर असते. विर्डीतून साखळीत येताना खाणीवरील रस्ता बराच अरूंद असल्याने या रस्त्याचे माजी नगराध्यक्ष राजेश सावळ यांनी पुढाकार घेऊन रूंदीकरण केले होते.

सध्या या रस्त्यावर माकरशेणो येथे ठिसूळ माती खाली उतरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या वर्षी पावसाळ्यात याच ठिकाणी तसेच वजरी गावात जाणाऱ्या रस्त्याच्या जंक्शनला लागूनच एका ठिकाणी दरड माती रस्त्यावर आली होती. ती नंतर हटविली. काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसात याच भागात रस्त्यावर माती आल्याचे दिसून आले.

...अन्यथा धोका

याही पावसाळ्यात गेल्या वर्षीप्रमाणेच स्थिती निर्माण झाली आहे. सतत पावसाचा मारा सुरू राहिल्यास ही माती रस्त्यावर येणार असल्याने साखळी पालिकेने संबंधित खात्याच्या मदतीने उपाययोजना करावी, अशी मागणी या रस्त्यावरून दररोज ये-जा करणाऱ्या वाहनचालकांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Live News: तिस्क-उसगाव येथे मध्यरात्री दुचाकीचा भीषण अपघात

Porvorim: पर्वरीतील कोंडीत वाहतूक पोलिसांचे हाल! रखरखत्या उन्हात होते आहे होरपळ

Dodamarg Excise Building: दोडामार्ग ‘अबकारी’ कार्यालयाची दुर्दशा! छपरावर आच्छादन, फुटकी कौले; त्वरित दुरुस्तीची मागणी

Goa News: गोव्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांसाठी नेतृत्व विकास कार्यक्रम! पुण्यातील 'इन्फोसिस सेंटर'मध्ये प्रशिक्षण

Old Goa Helipad: गोव्यात हेलिपॅडवरुन केवळ 55 यशस्वी उड्डाणे! खर्च मात्र कोटीत; 'बॅट' बेटाचा पर्याय पुढे

SCROLL FOR NEXT