Sao Jose de Areal 
गोवा

बेकायदेशीर प्‍लॉट पाडण्‍यासाठी पुतळ्याचे कारस्‍थान? क्रूझ सिल्‍वा यांनी व्यक्त केली शंका

Goa News: आमदार सिल्वा: बेकायदा ‘प्लांट’ निर्मितीसाठी प्रयत्न

दैनिक गोमन्तक

Sao Jose de Areal Cruz Silva

सां जुझे द आरियल येथे ज्‍या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्‍यात आला आहे, ती जागा पाहिल्‍यास या भागात बेकायदेशीर प्‍लॉट पाडण्‍यासाठी मुद्दामहून कुणीतरी हे कारस्‍थान रचले नाही ना? अशी शंका येते, असे वेळ्‍ळीचे आमदार क्रूझ सिल्‍वा यांनी सांगितले.

दै. गोमन्‍तक टीव्‍हीच्‍या ‘साश्‍‍टीकार’ या कार्यक्रमात बोलताना सिल्‍वा यांनी आपली शंका व्‍यक्‍त केली. ‘गोमन्‍तक’चे ब्‍युरो चीफ सुशांत कुंकळयेकर यांनी ही मुलाखत घेतली. पाच वर्षांपूर्वी या जागेकडे जाण्‍यासाठी बेकायदेशीररित्‍या रस्‍ता तयार करण्‍याचा प्रयत्‍न झाला होता.

मात्र गावकऱ्यांनी त्‍याला विरोध केल्‍याने हा प्रयत्‍न हाणून पाडला गेला. त्‍यानंतर आता त्‍या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्‍यात आला आहे. आधी हा पुतळा उभारुन नंतर त्‍या पुतळ्‍याकडे जाण्‍यासाठी वाट तयार करणे आणि त्‍या वाटेचा फायदा घेऊन नंतर बेकायदेशीर प्‍लॉट पाडणे हा त्‍या कारस्‍थानाचा भाग असू शकतो अशी शंका त्‍यांनी व्‍यक्‍त केली.

सिल्‍वा म्‍हणाले, आमचा पुतळ्याला विरोध नाहीच. आमचा विरोध आहे, तो हा पुतळा बसविण्याच्या बेकायदेशीर कृतीला. हा पुतळा त्‍या जागेत स्‍थापन करण्‍यासाठी प्रशासनाची परवानगी घेण्‍याची गरज नाही, असा दावा यापूर्वी शिवप्रेमी गटाने केला होता.

मात्र आज आपण जिल्‍हाधिकारी चंद्रू यांच्‍याकडे या संदर्भात खुलासा मागितला असता आपल्‍या कार्यालयाने अशी कोणतीही सूचना आयोजकांनी केली नव्‍हती, अशी माहिती आपल्‍याला दिली. ज्‍या जागेत हा पुतळा उभारला ती जागा खासगी असल्‍याने पुतळा उभारण्‍यासाठी पंचायतीची परवानगी घेण्‍याची गरज नाही, असा दावा मंत्री सुभाष फळदेसाई यांनी केली.

हा दावा खोडून काढताना सिल्‍वा म्‍हणाले, जर परवानगी नको असल्‍यास त्‍यासाठी पंचायतीकडे अर्ज का केला गेला? या पुतळ्‍याचा चौथरा उभारण्‍यासाठी काँक्रीटचे प्‍लॅटफॉर्म तयार केले गेले आहे. असे पक्‍के बांधकाम करताना पंचायतीची परवानगी घेणे आवश्‍‍यक आहे. या पुतळ्‍याकडे मंत्री फळदेसाई यांना जाता यावे, यासाठी शेतजमिनीतून जो बेकायदेशीर रस्‍ता केला, ती कृती बेकायदेशीर नव्‍हे का? असा सवाल त्‍यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pratiyuti Yog 2026: मेहनत करुन पदरी निराशा, लव्ह लाईफमध्ये दुरावा! जुलै महिन्यात ग्रहांचा महाभयंकर खेळ; 'डबल प्रतियुति योगा'मुळे 5 राशींवर ओढवणार संकट

Fake Call Centre Bust: हणजूण येथे बनावट कॉल सेंटरवर छापेमारी, क्राईम ब्रँचकडून 15 जणांना अटक; इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त

IND vs ENG: इंग्रजांविरुद्ध भिडणार टीम इंडिया! टी-20 मध्ये भारताचा दबदबा की इंग्लंडची दादागिरी? पाहा हेड-टू-हेड रेकॉर्ड

Viral Video: धावत्या ट्रेनमध्ये महिलेचं लाजिरवाणं कृत्य; 5 तास सुरू होता प्रकार, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Sadetod Nayak: डाग नसलेले उमेदवार काँग्रेसने देणे गरजेचे, त्यांनी विश्वासार्हता गमावली; भाजप निश्चितपणे पुन्हा जिंकेल

SCROLL FOR NEXT