Goa Investigation Dainik Gomantak
गोवा

Goa Investigation: सॅम्युअल ब्रागांझा मृत्यू प्रकरणाचा तपास अद्याप रखडलेलाच; आत्महत्येच्या प्राथमिक संशयानंतरही पडद्यामागचे गूढ वाढेना

Samuel Braganza Death Case: सॅम्युअलने आपल्या राहत्या घरात ५ जून रोजी, स्वतःवर गोळी झाडून आयुष्य संपविले होते. या प्रकरणात पोलिसांच्या संथ कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

म्हापसा: म्हापशातील गावसावाडो येथील महाविद्यालयीन विद्यार्थी सॅम्युअल ब्रागांझा याच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाला अनेक दिवस उलटून गेले तरी अद्याप या तपासात पोलिसांच्या हाती कोणतीही ठोस माहिती लागलेली नाही.

सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर झालेल्या ट्रोलिंगला कंटाळून सॅम्युअलने देशी कट्ट्याने (पिस्तूल) स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. मात्र, या घटनेला इतका काळ उलटूनही सॅम्युअलकडे ते पिस्तूल कुठून आले व त्याचा मूळ स्रोत काय होता, याचा शोध घेण्यात म्हापसा पोलिसांना अद्याप यश आलेले नाही.

सॅम्युअलने आपल्या राहत्या घरात ५ जून रोजी, स्वतःवर गोळी झाडून आयुष्य संपविले होते. या प्रकरणात पोलिसांच्या संथ कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. सॅम्युअलच्या शवविच्छेदन अहवालात त्याच्या डोक्यावर, डोळ्यावर गंभीर जखमा झाल्याचे समोर आले होते, ज्यामुळे या प्रकरणाला एक वेगळेच वळण मिळाले होते.

दरम्यान, सॅम्युअलचा म्हापसा पोलिस स्थानकात छळ झाला असल्याची तक्रार त्याच्या आईने पोलिस प्रशासनाकडे केली होती. या तक्रारीचा स्वतंत्र तपास पोलिस अधीक्षक विश्वेश कर्पे करत आहेत. मात्र, त्यांनी अद्याप आपला अहवाल उत्तर गोवा पोलिस अधीक्षकांकडे सादर केलेला नाही.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत ते हा अहवाल सुपुर्द करतील. कर्पे आपल्या अहवालात नक्की काय नमूद करतात किंवा या घटनेवर काय टिप्पणी करतात, यावर आता बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. तसेच, यावरून या प्रकरणाची पुढील दिशा ठरण्यासही मदत होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Weather Update: वाळपईत पावसाचे ‘शतक’! 2,552 मिमी पावसाची नोंद, मात्र किनारपट्टी भाग अजूनही कोरडाच

Viral Video: तेलाच्या टँकमध्ये पठ्ठ्यानं मारली डुबकी, तरुणाचा कारनामा पाहून लोकांचा चढला पारा; म्हणाले, ''भावा, जरा तरी लाज बाळग!"

Porvorim Development: पर्वरीचा विकास वेगाने; परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम! फ्लायओव्हरपासून शेती, आरोग्य आणि क्रीडा सुविधांपर्यंत बदलांचा वेध

Parenting Rules For Children: मुलांना ‘नाही’ म्हणण्याची भीती बाळगू नका; आजची छोटी मर्यादा उद्याची मोठी दुर्घटना टाळू शकते!

Goa Congress: 'गोवा काँग्रेस' नावाला काँग्रेसचा आक्षेप; गिरीश चोडणकरांची गोवा खंडपीठात धाव, निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सवाल

SCROLL FOR NEXT