Samuel death mystery update Dainik Gomantak
गोवा

सॅम्युअल मृत्यू प्रकरणाला नवं वळण; पोलिस अधीक्षकांनी नोंदवले ब्रागांझा कुटुंबीयांचे जबाव, पोलिसांच्या कारवाईवर आमदार फेरेरांचे आक्षेप

Samuel Braganza Death Case: गावसावाडा येथील सॅम्युअल ब्रागांझा यांच्या मृत्यू प्रकरणी त्यांच्या आईने उत्तर गोवा पोलिस अधीक्षकांकडे लेखी तक्रार दाखल केली होती.

दैनिक गोमन्तक डिजिटल

म्हापसा: गावसावाडा येथील सॅम्युअल ब्रागांझा यांच्या मृत्यू प्रकरणी त्यांच्या आईने उत्तर गोवा पोलिस अधीक्षकांकडे लेखी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे पोलिस अधीक्षक विश्वेश कर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या स्वतंत्र आणि सखोल तपास सुरू आहे. या तपासाचा भाग म्हणून बुधवारी (ता. १६) अधीक्षक कर्पे यांनी सॅम्युअलच्या घरी भेट देऊन त्याची आई आणि बहीण यांचे जबाब नोंदवून घेतले.

विशेष म्हणजे, यावेळी हळदोण्याचे आमदार ॲड. कार्लुस फेरेरा हेही ब्रागांझा यांच्या घरी उपस्थित होते. दरम्यान, तीन दिवसांपूर्वी अधीक्षक कर्पे यांनी सॅम्युअलच्या कुटुंबीयांचे जबाब नोंदविण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी भेट दिली होती. मात्र, त्यावेळी घरात कोणीही उपस्थित नसल्याने पथकाला माघारी परतावे लागले होते.

जबाब नोंदविल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना अधीक्षक कर्पे म्हणाले, ‘‘मृताच्या आईने दिलेल्या तक्रारीच्या आधारे मी तपास करत आहे. या तक्रारीमध्ये प्रामुख्याने पोलिसांची कार्यपद्धती, सॅम्युअलचा व्हिडिओ व्हायरल करणारी व्यक्ती आणि सोशल मीडिया या तीन प्रमुख बाबींचा समावेश आहे. इतर बाबींबद्दल मला माहिती नाही. लवकरच मी माझा तपास अहवाल उत्तर गोवा पोलीस अधीक्षक हरिश्चंद्र मडकईकर यांच्याकडे सुपूर्द करीन.’’

यासंदर्भात आमदार कार्लुस फेरेरा यांनी पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले, ‘‘सॅम्युअलच्या कथित व्हायरल व्हिडिओमध्ये कोणतीही व्यक्ती प्रत्यक्ष कचरा फेकताना दिसत नाही. केवळ दोन व्यक्तींमधील संभाषण ऐकू येते. तसेच या व्हिडिओमध्ये नेमका कोणता कचरा फेकला गेला, हेही स्पष्ट होत नाही. असे असताना पोलिसांनी नेमक्या कोणत्या पुराव्यांच्या आधारे गुन्हा नोंदविला, हे समजत नाही.’’

या प्रकरणात दाखल करण्यात आलेला एफआयआर पूर्वग्रहदूषित असून, जाणीवपूर्वक त्रास देण्याच्या हेतूने तो नोंदविण्यात आल्याचा दावा फेरेरा यांनी केला. सॅम्युअलवर बेकायदा शस्त्र बाळगल्याचा आरोप करत पोलिसांनी एका मृत व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदविला. हा अत्यंत गंभीर प्रकार असून संबंधित व्यक्तीची सामाजिक प्रतिमा मलिन करण्याचा हा प्रयत्न आहे. मुळात, माणसाचा मृत्यूही सन्मानजनक असायला हवा, असे सांगत फेरेरा यांनी पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेतला.

विनापरवाना पिस्तूल बाळगल्याप्रकरणी मृत तरुणावरच गुन्हा

गावसावाडा-म्हापसा येथील सॅम्युअल गार्विन दी ब्रागांझा (२२) या तरुणाने अवैध पिस्तुलाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती. ही घटना गुरुवार, ४ जून रोजी मध्यरात्री ते शुक्रवार, ५ जून रोजी पहाटे १२.३० वाजण्याच्या दरम्यान घडली होती. त्यावेळी पोलिसांना घटनास्थळावरून एक देशी कट्टा (पिस्तूल) आणि रिकामे काडतूस सापडले होते. याच पिस्तुलाच्या साहाय्याने सॅम्युअलने स्वतःवर गोळी झाडल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.

पुढील पोलीस चौकशीत आत्महत्येसाठी वापरण्यात आलेल्या या देशी कट्ट्याला कोणताही वैध परवाना नसल्याचे आणि ते बेकायदेशीररीत्या बाळगल्याचे आढळून आले. त्यामुळे विनापरवाना बेकायदा पिस्तूल बाळगणे आणि त्याचा वापर करून आत्महत्या केल्याच्या आरोपाखाली म्हापसा पोलिसांनी मृत सॅम्युअल याच्याविरुद्ध आर्म्स ॲक्टच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.

सॅम्युअलने ज्या पिस्तूलाने स्वतःचे जीवन संपविले, त्या शस्त्राचा स्रोत शोधणे हे पोलिसांचे काम आहे. या पिस्तुलाबाबत आम्ही त्याच्या कुटुंबीयांकडे चौकशी केली; मात्र त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही. घरात विनापरवाना पिस्तूल आढळणे ही गंभीर बाब आहे. त्यामुळेच आम्ही मृत सॅम्युअल यांच्याविरुद्ध शस्त्र कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविला. मुळात, पोलिसांचा सॅम्युअल किंवा त्याच्या कुटुंबीयांना बदनाम करण्याचा कोणताही हेतू नाही. ही प्रक्रिया केवळ तपासाचा एक भाग आहे.-

सलीम शेख, पोलिस अधीक्षक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bison In Goa: एक दोन नव्हे तर तब्बल 9 गवे! कुर्टी परिसरात गव्यांच्या टोळीचा बिनधास्त वावर; स्थानिकांत भीती, रानात हुसकावून लावण्याची मागणी

"तुम्ही RSS चे एजंट बनलात..." कश्मीरी पंडितांना दहशतवाद्यांची पुन्हा उघड धमकी; नावासह घर क्रमांक लिहून पाठवलं चिथावणीखोर पत्र

Navpancham Yog 2026: सप्टेंबर महिन्याची सुरुवातच ठरणार जॅकपॉट! गुरु-शनिच्या 'नवपंचम योगा'ने चमकणार 4 राशींचे नशीब; घरात नांदणार सुख-समृद्धी

Morjim Drugs Bust: मोरजीतील गेस्ट हाऊसवर पोलिसांचा छापा; 'ड्रग्स' रॅकेटचा पर्दाफाश, तीन सेनेगाली नागरिक अटकेत, 33 लाखांचा मुद्देमाल जप्त

हेरिटेज संरक्षणात विलंब भोवणार, केंद्रीय प्राधिकरणावर कोर्टाची नाराजी; अधिकाऱ्यांनाही इशारा

SCROLL FOR NEXT