Samantha Fernandes
Samantha Fernandes Dainik Gomantak
गोवा

Crime News : मृत्यूपूर्वी समंथाने आईला दिली होती छळाची कल्‍पना; वकिलांचा दावा

गोमन्तक डिजिटल टीम

Crime News : मडगाव, ज्या दिवशी समंथा फर्नांडिस हिचा मृत्यू झाला, त्याच्या एक दिवस आधी तिने आपल्या आईला फोन करून सासूकडून आपला छळ होत आहे आणि आपल्या जीवाला धोका आहे असे सांगितले होते, असा दावा सरकारी वकील उत्कर्ष आवडे यांनी न्‍यायालयात केला.

हुंड्यासाठी छळ करून समंथा फर्नांडिस या आपल्या सुनेचा बळी घेतल्याचा आरोप असलेली तिची सासू पेट्रोसिना फर्नांडिस हिने अटकपूर्व जामिनासाठी केलेल्या अर्जावर आज दक्षिण गोवा अतिरिक्त सत्र न्यायाधीश पूजा कवळेकर यांच्यासमोर सुनावणी झाली. या जामिनाला विरोध करताना वकिलांनी वरील दावा केला. या अर्जावरील पुढील सुनावणी १३ डिसेंबरपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.

गेल्‍या ३० ऑगस्ट रोजी ही घटना घडली होती. समंथा हिने स्वतःला जाळून घेतल्याने तिचा मृत्यू झाला होता. लग्न होऊन पाच वर्षांतच मृत्यू झाल्याने या प्रकरणाची चौकशी उपजिल्हाधिकाऱ्यांकडून करण्यात आली. सासूच्या वतीने युक्तिवाद करताना ॲड. अमेय प्रभुदेसाई यांनी हा प्रकार हुंडाबळीचा नसून ती आत्महत्या असल्‍याचा दावा केला.

गुन्हा नोंद उशिरा !

समंथा फर्नांडिस मृत्यू प्रकरणात तिच्या सासूचा हात आहे, असा दावा आता पोलिसांकडून केला जात आहे. जर तसेच असते तर ह्या प्रकरणात गुन्हा नोंद करण्यासाठी पोलिसांना तीन महिने वाट का पहावी लागली असा सवाल पेट्रोसिना फर्नांडिस यांचे वकील अमेय प्रभुदेसाई यांनी दक्षिण गोवा सत्र न्यायालयात युक्तीवादावेळी उपस्थित केला. आपल्या अशिलावर खोटा आळ घातला जात असल्याचा दावा त्यांनी केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

FDA Goa: म्हापशात 510 किलो पनीरसह कांदा जप्त; एफडीएकडून दुसऱ्यांदा कारवाई

Goa Crime: कौटुंबिक वादातून महिलेने उचललं मोठ पाऊल; पोटच्या मुलांना फिनाईल पाजत केला आत्महत्येचा प्रयत्न

Mormugao Sada: सडा परिसरात लवकरच उभे राहणार प्राथमिक आरोग्य केंद्र; मुख्यमंत्री सावंत

FC Goa: नुवेच्या रॉलिन बोर्जिस याच्याशी एफसी गोवाचा कायमस्वरुपी करार, अनुभवाचा होणार फायदा

Goa Today's Live News: गोव्याच्या विनाशावर भाजपचे मौन; युरी आलेमाव

SCROLL FOR NEXT