रोहण खवंटे  Dainik Gomantak
गोवा

साल्वादोर द मुंद जमीन घोटाळ्याची चौकशी CBI किंवा ED कडे सोपवावी - रोहन खवंटे

गोमन्तक डिजिटल टीम

साल्वादोर द मुंद जमीन घोटाळ्याची चौकशी CBI किंवा ED कडे सोपवावी असे गोव्याचे पर्यटन मंत्री रोहन खवंटे यांनी म्हटले आहे. तसेच, जमीन घोटाळ्यांच्या चौकशीसाठी विशेष समितीची मागणी मीच केली होती. असे खवंटे यांनी म्हटले आहे. काँग्रेस नेते गिरीश चोडणकर यांनी जमीन हडप प्रकरणात भाजपच्या एका कॅबिनेट मंत्र्याचा समावेश असल्याचा आरोप केला. त्यानंतर पहिल्यांदाच पर्यटन मंत्री रोहन खवंटे यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

गिरीश चोडणकर यांनी काय आरोप केला आहे?

गिरीश चोडणकर यांनी जमीन हडप प्रकरणात भाजपच्या एका कॅबिनेट मंत्र्याचा समावेश असल्याचा आरोप केला आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना चोडणकर यांनी याप्रकरणात दोषी असलेल्या मंत्र्यावर कारवाई करण्यासाठी थेट आव्हानच दिलं आहे.

अँथनी मॅन्युअल रिबेलो आणि हेझल सेवेरिनो मेंडोंका यांच्या 3250 चौमी जमिनीच्या घोटाळ्याचा आरोप करण्यात आला आहे, जो साल्वादोर द मुंद पंचायत क्षेत्रातील 221/25 सर्व्हे क्रमांकावर नोंदवण्यात आला आहे. आता आपण विशेष तपास पथक नेमकी कोणती कारवाई करतं याची वाट पाहणार आहे, असं गिरीश चोडणकर म्हणाले आहेत.

जमीन हडप प्रकरणांत एकही मंत्री सहभागी नाही - मुख्यमंत्री

‘माझा एकही मंत्री जमीन हडप प्रकरणांमध्‍ये सहभागी नाही. गिरीश चोडणकर यांनी आरोपबाजी करण्‍यापेक्षा आपल्‍याकडील पुरावे ‘एसआयटी’कडे सादर करावेत’, असे आव्‍हान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT