Salpe Lake Pollution Dainik Gomantak
गोवा

Salpe Lake Pollution: साळपे तलावात सांडपाणी सोडणे ताबडतोब थांबवा! प्रदूषण रोखण्यासाठी न्यायालयाचा आदेश

Salpe Lake pollution Goa: साळपे तलावाच्या प्रदूषणाबाबत दाखल झालेल्या जनहित याचिकेचा निपटारा करताना मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने संबंधित यंत्रणांना कठोर निर्देश दिले आहेत.

Sameer Amunekar

पणजी: साळपे तलावाच्या प्रदूषणाबाबत दाखल झालेल्या जनहित याचिकेचा निपटारा करताना मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने संबंधित यंत्रणांना कठोर निर्देश दिले आहेत.

तलावामध्ये सांडपाणी सोडणे तातडीने थांबवावे, तसेच पुढील काळात प्रदूषण होऊ नये यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे आदेश गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, मडगाव नगरपालिका आणि सीवरेज इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ गोवा लिमिटेड यांना देण्यात आले आहेत.

महाधिवक्ता देविदास पांगम यांनी सांगितले की, तलाव परिसरातील सर्व घरे आणि व्यावसायिक आस्थापनांना सांडपाणी व्यवस्थापन करण्याची सूचना देण्‍यात आली आहे.

नगरपालिका तलाव परिसरावर बारकाईने लक्ष ठेवून प्रदूषणाच्या तक्रारी तत्काळ नोंदविण्याची जबाबदारी देखील देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ज्या खालच्या भागांमध्ये सांडपाणी पाईपलाईन टाकणे कठीण आहे, तिथे विशेष पंपिंग सिस्टम उभारण्याची सोय केली जात आहे. त्यामुळे हा प्रकल्प निश्चित कालावधीत पूर्ण करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Passport Fee Hike: परदेश प्रवास करणाऱ्यांना मोठा झटका! 1 जुलैपासून पासपोर्ट शुल्कात वाढ; अर्ज करण्यापूर्वी जाणून घ्या नवीन दर

Goa Yellow Alert: धुवांधार पाऊस अन् सोसाट्याचा वारा! गोव्यात पावसाची जोरदार बॅटिंग; पुढील 5 दिवस 'यलो अलर्ट'

Goa Crime: जाब विचारण्याची किंमत जीवाने! चिखली-कोलवाळ येथे मद्यधुंद युवकांकडून खून; नातेवाईकांनाही बेदम मारहाण

NCERT चा मोठा निर्णय! 9 वीच्या पुस्तकात आता 'आणीबाणी'ची एन्ट्री; पहिल्यांदाच विद्यार्थी शिकणार 1975 चा इतिहास

Goa Tourism Projects: 'टाऊन स्क्वेअर'ची मंत्र्यांकडून पाहणी, पर्यटन विकासासाठी केंद्राच्या सहकार्याची ग्वाही

SCROLL FOR NEXT