Goa Mining Problems Dainik Gomantak
गोवा

Goa Mining: नववर्षाच्या पहिल्याच दिवशी 'खाण'प्रश्न तापणार? पीडित शेतकऱ्यांसह ग्रामस्थांची डिचोलीत बैठक

Bicholim Mining Meeting: शिरगाव-मये ब्लॉक अंतर्गत येणारी ही खाण पूर्वी चौगुले कंपनीच्या मालकीची होती. मात्र खाण ब्लॉक लिलावावेळी ही खाण मेसर्स साळगावकर शिपिंग कंपनीने मिळवली आहे.

Sameer Panditrao

Paira Mayem Mining Bicholim Meeting

डिचोली: पैरा येथील साळगावकर शिपिंग कंपनीची खाण सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर उद्या (बुधवारी) खाणपीडित मयेतील शेतकऱ्यांसह ग्रामस्थांची एक महत्त्वाची बैठक बोलाविण्यात आली आहे.

नववर्षारंभीच होणारी ही बैठक नुकसान भरपाई आदी गावच्या प्रलंबित प्रश्नांवरून तापण्याची शक्यता आहे. डिचोलीच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी रोहन कासकर यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी ११ वाजता ही बैठक होणार आहे.

या बैठकीस मामलेदारांसह खाण कंपनीचे अधिकारी यांच्यासह मये-वायंगिणी पंचायत मंडळ उपस्थित राहणार आहे. दरम्यान, या बैठकीसंदर्भातची नोटीस आज (मंगळवारी) जारी करण्यात आल्याने रात्री उशिरापर्यंत खाणपिडीत काही शेतकरी आणि लोकांना या बैठकीसंदर्भात माहिती मिळाली नव्हती.

त्यामुळे त्यांच्यात नाराजी पसरली होती. शिरगाव-मये ब्लॉक अंतर्गत येणारी ही खाण पूर्वी चौगुले कंपनीच्या मालकीची होती. मात्र खाण ब्लॉक लिलावावेळी ही खाण मेसर्स साळगावकर शिपिंग कंपनीने मिळवली आहे. या खाणीसाठी ''ईसी'' मिळाली असून, खाण सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. गावचे प्रलंबित प्रश्न सोडवा. नंतरच खाण सुरू करा, अशी शेतकऱ्यांसह लोकांची मागणी आहे.

नुकसान भरपाईचा विषय तापणार

खाण व्यवसायामुळे मयेतील शेती व्यवसाय संकटात आला आहे. खाण सुरू करण्यापूर्वी साळगावकर कंपनीने शेतकऱ्यांची नुकसान भरपाई देताना गावचे प्रलंबित प्रश्न सोडवावेत, अशी मागणी या खाणपट्टा भागात येणाऱ्या जनतेची आहे. मुळाक खाजन, पांगर खाजन, किसान सभा आदी संघटनेंतर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांना २०१३ पासून पूर्वाश्रमीच्या चौगुले खाण कंपनीकडून नुकसान भरपाई मिळालेली नाही. ही नुकसान भरपाई मिळावी म्हणून शेतकऱ्यांचा संघर्ष सुरू आहे. यापूर्वी शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलनेही केली आहेत.

कंत्राटी पद्धत नकोच

खाणबंदीमुळे पैरा-मये भागात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. खाण व्यवसायाला आमचा विरोध नाही. मात्र प्रमुख प्रश्न सुटलेच पाहिजेत. घरी बसण्याची पाळी आलेल्या पूर्वाश्रमीच्या चौगुले कंपनीच्या कामगारांना पुन्हा कामावर रुजू करून घ्यावे. रोजगाराबाबतीत स्थानिकांना प्राधान्य द्यावे. स्थानिक ट्रकांना काम द्यावे. शेतकरी आणि खाण अवलंबितांचे प्रश्न सोडवा. कंत्राटी पद्धत रद्द करा, अशी स्थानिकांची मागणी आहे. महिन्यापूर्वी मये-वायंगिणीचे सरपंच कृष्णा चोडणकर यांच्यासह अन्य काही पंचसदस्यांनी तशी मागणी केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope 25 Saptember 2026: धनलाभाचा प्रबळ योग आणि यशाचा मार्ग खुला! लाडक्या बाप्पाला निरोप देताना उजळणार 'या' राशींचं भाग्य; ग्रह-नक्षत्रांची मोठी उलथापालथ

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

SCROLL FOR NEXT