Onion Market Price In Goa Dainik Gomantak
गोवा

Onion Market Price In Goa: कमी प्रतवारीच्या कांद्याची विक्री!

Onion Market Price In Goa: सध्या कांद्याचे वाढलेले दर पाहता येथील विक्रेत्यांकडे येणारा कांदा कमी प्रतवारीचा असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

दैनिक गोमन्तक

Onion Market Price In Goa: सध्या कांद्याचे वाढलेले दर पाहता येथील विक्रेत्यांकडे येणारा कांदा कमी प्रतवारीचा असल्याचे स्पष्ट दिसत आहे. मागील काही आठवड्यांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे साठवलेल्या कांद्यावर त्याचा परिणाम झाल्याने त्याची प्रतवारी घसरलेली आहे.

बेळगाव बाजारात कमी भावाने घाऊक व्यापारी ५० रुपयांपेक्षाही कमी दराने खरेदी करतात, परंतु गोव्यात ग्राहकांच्या हातात पडेपर्यंत त्याची किंमत ६० ते ६५ रुपयांपर्यंत गेलेली दिसून येत होती.

चांगला सुकलेला आणि वरील पापुद्रेही चांगल्या पद्धतीने सुकलेली, दिसायलाही आकर्षक, तसेच कमी लाली असलेला असा उच्च दर्जाचा कांदा बाजारात अपवादाने दिसत आहे. पावसामुळे फटका बसल्याने वरील पापुद्रे खराब झालेला कांदा

बाजारात आहे. बेळगावात जो कांदा येतो, तोच गोव्यातही आणला जातो. त्यामुळे बेळगाव बाजारातच कमी प्रतीचा कांदा येत असल्याने गोव्यातही तोच विक्रेत्यांकडे पहायला मिळत आहे.

सध्या बाजारपेठेत भाज्यांचे दर काहीसे स्थिर असले तरी मागील आठवडाभरात कांद्याने मात्र 'पन्नाशी' गाठली होती. राज्यासह लगतच्या महाराष्ट्रात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने कांदा उत्पादकांनी कांदा बाजारपेठेत विक्रीसाठी आणला नाही. परिणामी कांदा 50 रु किलो दराने विकला जात होता. बाजारात तुटवडा निर्माण झाल्यामुळे कांद्याचे दर वाढले असल्याचे बोलले जात होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ECB New Rules: दारूला पूर्ण बंदी, सोशल मीडियावरही नियंत्रण! क्रिकेटपटूंसाठी बोर्डाचे 6 कडक नियम लागू, शिस्तभंगावर करडी नजर

VIDEO: "मनीषाशीच लग्न लावा, नाहीतर जीव देईन"; तरुणी चढली मोबाईलच्या टॉवरवर, समलैंगिक प्रेमप्रकरणाचा हायव्होल्टेज ड्रामा

Crime News: आईवर डोळा, मुलगा ठरला अडथळा; आठ वेळा जमिनीवर आपटून दीड वर्षांच्या चिमुकल्याची हत्या, आरोपीला फाशीची शिक्षा

Rajpal Yadav Jail: राजपाल यादवच्या अडचणीत वाढ! चेक बाऊन्स प्रकरणात हाय कोर्टाचा दणका, 3 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा

Goa Crime: सिकेरीत रिसॉर्टजवळ सापडला शाहिद आफ्रिदीचा मृतदेह, कांदोळी समुद्रकिनाऱ्यावरून झाला बेपत्ता

SCROLL FOR NEXT