Goa News Dainik Gomantak
गोवा

FSSI: खाद्य परवाना प्रदर्शीत न करताच 'सरस' प्रदर्शनात खाद्य पदार्थांची विक्री

गोवा 'कॅन' संघटनेकडून 'सारस' मधील त्रुटी उघड

गोमन्तक डिजिटल टीम

ग्रामीण विकास यंत्रणा खात्यातर्फे आयोजित केलेल्या सरस या वस्तू विक्री प्रदर्शनात चायना मेड माल विकला जात असल्याचे या पुर्वी उघडकीस आणलेल्या गोवा कॅन या संघटनेने आज पुन्हा या प्रदर्शनातील त्रुटी उघड करतांना येथे खाद्य पदार्थांची करणाऱ्या स्टॉल्स वरील विक्रेते एफएसएसआयचा परवाना प्रदर्शीत न करताच ही विक्री करत असल्याच्या गोष्टीवर उजेड टाकला.

आज गोवा कॅनच्या कार्यकर्त्यानी या प्रदर्शनाला भेट देऊन पाहणी केली असता येथील कित्येक खाद्य पदार्थ स्टॉल्सवर हा परवाना प्रदर्शित न केल्याचे दिसून आले.

याबद्दल विचारणा केली असता काही जणांनी आपल्या मोबाईलवर असलेली सॉफ्ट प्रत दाखविली.

मात्र त्या प्रतची कॉपी काढून ती स्टॉल्सवर प्रदर्शित करण्यास नकार दिला. शेवटी दम भरल्यावर त्यांनी ही प्रत प्रदर्शित केली असे गोवा कॅनचे रोलांड मार्टीन्स यांनी सांगितले.

मार्टीन्स म्हणाले, जिथे जिथे असे खाद्य पदार्थ विकले जातात त्या त्या ठिकाणी या परवान्याची प्रत प्रदर्शित करणे कायद्याने अनिवार्य आहे. मात्र येथे हा कायदा पाळला जात नाही.

याबद्दल आम्हीं एसजीपीडीएचे अध्यक्ष दाजी साळकर यांच्याकडे तक्रार करणार असून त्यांच्या मैदानाचा असा बेकायदेशीर वापर केला जात आहे हे त्यांच्या लक्षात आणून देऊ असे त्यांनी सांगितले.

मागच्या आठवड्यात याच संस्थेने या प्रदर्शन स्थळी चायना मेड माल विकत असल्याचे लक्षात आणून देऊन या स्टॉल्सवर वजन व माप खात्याला छापा मारण्यास भाग पाडले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa PWD Workers Regularisation: 1,399 ‘PWD’ कामगारांना हायकोर्टचा मोठा दिलासा; 9 फेब्रुवारी 2021 पासून सेवेत, वरिष्ठता आणि निवृत्तीवेतनाचे सर्व लाभ देण्याचे स्पष्ट निर्देश

Vijay Sardesai Congress: काँग्रेसच्या 'हाता'वर पुन्हा विश्वास ठेवायला गोवा फॉरवर्डचा 'नारळ' तयार नाही! पक्षाध्यक्ष विजय सरदेसाई यांचा स्वबळावर लढण्याचा इशारा

Swiggy Warehouse Fraud Goa: बनावट नोंदीद्वारे ‘स्विगी’च्या कर्मचाऱ्यांनीच लुटले गोदाम; 93 लाखांचा ऐवज लांबविला, वेर्णा पोलिसांकडून गुन्हा दाखल

Goa Shipyard Jaigad Project: जयगडकडे 660 एकरवर अत्याधुनिक जहाजबांधणी प्रकल्प; वास्कोत अडथळे, गोवा शिपयार्डचा मोर्चा, जर्मन कंपनीकडे सल्लागाराची धुरा

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

SCROLL FOR NEXT