ACGL worker Salary Issue Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील एसीजीएल कंपनीचा पगारवाढ प्रश्न मिटला

सरकारच्या हस्तक्षेपामुळे आले यश

दैनिक गोमन्तक

पिसुर्ले: गेल्या कित्येक दिवसांपासून ऐरणीवर आलेला एसीजीएल कंपनीच्या कामगाराच्या पगारवाढीचा मुद्दा संपुष्टात आला असल्याची खास सुत्रांकडून माहिती मिळाली. सदर कामगारांना सन 2018 पासून पगारवाढ मिळाली नव्हती, त्यामुळे कामगार आक्रमक बनले होते. यापुर्वी पाच दिवस संप पुकारून कंपनी व सरकारला जागे केले होते, परंतू कंपनी व्यवस्थापन कोणतीच भूमिका घेत नसल्याने संपाची आणखीन त्रीव करण्यासाठी कामगार संघटनेच्या वतीने दि 2 रोजी पासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा कंपनीला दिला होता. (ACGL worker Salary Issue)

याचीच दखल घेऊन हे प्रकरण आणखीन चिघळू नये यासाठी मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्या आदेशानुसार कामगार आयुक्तांनी हस्तक्षेप करून कंपनी व्यवस्थापन व कामगार संघटना यांच्या सोबत गेल्या शुक्रवारी बैठक घेऊन काही महत्त्वाच्या विषयावर चर्चा घडवून आणली होती. त्यामुळे हे प्रकरण मिटणार अशी शक्यता निर्माण झाली होती.

त्याप्रमाणे सदर कामगारांच्या पगारवाढीच्या मुद्द्यावर दि 28 फेब्रुवारी तसेच दि 1 मार्च रोजी कामगार आयुक्तांनी बैठका घेऊन सुवर्णमध्य असा तोडगा काढण्याचा प्रयत्न केला होता. त्या प्रयत्नांना यश आले असून रात्री उशिरा कंपनी व्यवस्थापन व कामगार संघटना यांच्यात मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांच्या उपस्थितीत पगारवाढीच्या करारांवर स्वाक्षरी होणार असल्याचे समजले आहे. या कराराचा सविस्तर तपशील मिळू शकला नाही.

सदर कंपनीच्या (Company) कामगाराचा संप होणार असल्याने होंडा औद्योगिक वसाहतीत कार्यरत असलेल्या लघुउद्योजक व कंत्राटी कामगारा मध्ये चिंता निर्माण झाली होती. परंतु आता बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असलेल्या विषयाला पुर्ण विराम मिळाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT