Sal News : साळ, येथील महादेव भूमिका देवस्थानचा दीड दिवसांचा वार्षिक भजनी सप्ताह उत्साहात साजरा झाला. वरचावाडा येथील सिद्धेश्वर देवस्थानच्या प्रांगणातून विठोबाची पालखी मिरवणुकीने भूमिका मंदिरात आणण्यात आली.
त्यानंतर अखंड भजनी सप्ताहाला सुरवात झाली. यात गावातील पाच पारांनी भजने सादर केली.महादेव मंदिराच्या सभामंडपात संगीत बैठकीचे आयोजन केले होते. ऋतुजा लाड (मुंबई) आणि सौरभ काडगावकर (पुणे ) यांनी यावेळी गायन केले.
ऑर्गनवर दत्तराज सुर्लकर, तबल्यावर संकेत खलप, पखवाजवर किशोर तेली तर टाळ राहुल खांडोळकर यांनी साथसंगत केली.
मानसी वाळवे यांनी निवेदन केले. त्यानंतर चित्ररथ मिरवणूक काढली. पार नं.२ तर्फे निषाद क्रिएशन निर्मित "चांदणे स्वरांचे" या संगीतमय कार्यक्रमात गोमंतकीय युवा गायक नवाब शेख, नम्रता पराडकर व अक्षता रामनाथकर यांनी गायन केले. नेहा उपाध्ये यांनी निवेदन केले.
संवादिनी शिवानंद दाभोळकर, तबला नितीन कोरगावकर. सिंथेसायझर बाळकृष्ण मेस्त, ऑक्टोपॅड आश्विन जाधव यांनी संगीत साथ केली. पार नं. ५ तर्फे वरचावाडा सिद्धेश्वर मंदिराच्या प्रांगण येथून दिंडी मिरवणुकीने पालखीचे भूमिका मंदिरात आगमन झाले.
दुसऱ्या दिवशी दुपारी सिद्धेश्वर मंदिराच्या प्रांगणातून पालखी मिरवणूक आल्यानंतर भजनाचे समापन झाले, त्यानंतर महाआरती, रिंगण सोहळा, नारळ काढून घेण्याच्या खेळ व दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम झाला. शाबी परब यांनी दहीहंडी फोडली.
श्रीफळ विसर्जनानंतर सामुहिक गाऱ्हाणे घालून सप्ताहाची सांगता झाली. या सप्ताहाला मोठ्या संख्येने भाविक व रसिकांनी उपस्थिती लावली व भजनाचा आस्वाद घेतला. सप्ताह यशस्वी केल्याबद्दल देवस्थान समितीने ग्रामस्थ व इतर भाविकांचे आभार मानले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.