Sakhali Accident News Dainik Gomantak
गोवा

Sakhali Accident News: साखळीत कारची दुचाकीला धडक; दुचाकीवर मागे बसलेल्या महिलेचा मृत्यू

कारचालक अखिलेश जंध्याला याला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

Kavya Powar

Sakhali Accident News: राज्यात वाढलेल्या अपघातांमुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. मध्यंतरी घडलेल्या बाणस्तारी अपघातामुळे गोव्यात राजकीत वर्तुळात वादंग सुरू आहे. यातच साखळीतील अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.

माहितीनुसार, काल रात्री साखळीत एका चारचाकीची दोन दुचाकीला धडक बसली. यामध्ये दोन्ही दुचाकीचालक आणि मागे बसलेल्या गिजीमोळ नायर (45), असे सर्वच जण जखमी झाले होते.

दरम्यान त्यांना रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी गिजीमोळ नायर यांना मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी कारचालक अखिलेश जंध्याला याला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, पर्वरीमध्येही एक भीषण अपघात घडला आहे. थार कारने दुचाकीला फरफटत नेल्याने दुचाकी चालकाचा मृत्यू झाला आहे. कारने सुमारे 100 मीटर फरफटत नेल्याचे स्थानिकांनी सांगितले. सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली.

अपघातस्थळी तात्काळ पोलीस दाखल झाले व त्यांनी पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT