Saint Mira Bai sculpture at Big Foot Museum Loutolim Goa Dainik Gomantak
गोवा

खडकावर कोरलेलं संत मीराबाईंचे भारतातील एकमेव शिल्प, गोमंतकीय संस्कृतीचे दर्शन घडवणारे बिग फूट संग्रहालय Video

Big Foot Museum Loutolim Goa: हातात विणा घेतलेली संत मीराबाई बिग फूट संग्रहालयाचे आकर्षण आहे.

Pramod Yadav

लोटली: गोव्यात अनेक प्रसिद्ध संग्रहालय आहेत. पणजीतील राज्य सरकारचे संग्रहालय असो किंवा जुने गोवे येथील पुरातत्व खात्याचे संग्रहालय असो. ऐतिहासिक आणि प्राचीन वस्तू, शिल्प आणि कलाकृतींचा ठेवा येथे पाहायला मिळतो. अशाचपद्धतीचे गोमंतकीय ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडविणारे संग्रहालय लोटलीत आहे.

विशेष बाब म्हणजे येथे भारतातील एकमेव खडकावर कोरलेलं संत मीरबाईंचे शिल्प पाहायला मिळेल.

मयेंद्र अल्वारिस यांनी २९ वर्षापूर्वी मोठ्या खडकावर शिल्प तयार केले आहे. १४ फूट उंच आणि दहा फूट रुंद ही कलाकृती भारतातील अशाप्रकारची एकमेक कलाकृती आहे. हातात विणा घेतलेली संत मीराबाई बिग फूट संग्रहालयाचे आकर्षण आहे.

१९९६ साली अल्वारिस यांनी या कलाकृतीची निर्मिती केली असून, त्याची लिम्का बूक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे.

संत मीराबाईच्या या शिल्पाला तीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दल अलिकडेच येथे जल्लोषात आनंद साजरा करण्यात आला.

लोटली येथील बिग फूट संग्रहालयात ग्रामीण गोव्याची झलक पाहायला मिळते. संग्रहालयात गोमंतकीय संस्कृतीची प्रतिकृती उभारण्यात आलीय. गोमंतकीयांचे राहणीमान, खाद्यसंस्कृती, सण, उत्सव, जीवनशैली याची हुबेहूब प्रतिकृती येथे पाहायला मिळतात.

मोठ्या प्रमाणावर देशी - विदेशी पर्यटक या संग्रहालयाला भेट देत असतात. बॉलिवूडच्या सिने कलाकारांना देखील या संग्रहालयाची भूरळ पडल्याचे पाहायला मिळते. दरवर्षी अनेक सिने कलाकार येथे आवर्जुन भेट देत असतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT