Saint Francis Xavier Dainik Gomantak
गोवा

Saint Francis Xavier: चीनमध्ये मृत्यू झालेल्या झेवियर यांचे शव गोव्यात कसं आलं? संत फ्रान्सिस यांचा जीवनप्रवास

Saint Francis Xavier History: झेवियर यांनी संपूर्ण आयुष्य पंथप्रचाराला पूर्ण वाहून घेतले व समर्पित केले होते.

Pramod Yadav

Saint Francis Xavier History, Importance Connection To Goa

पणजी: छत्रपती संभाजी महाराजांनी गोव्यावर केलेले आक्रमण परतवून लावण्यासाठी संत फ्रान्सिस झेवियर याच्या चरणी प्रार्थना करण्यात आली. योगायोग म्हणा किंवा पोर्तुगीजांच्या भाषेत चमत्कार म्हणा...संभाजीराजे माघारी फिरले..गोव्याच्या रक्षणासाठी धावून आलेल्या झेवियर यांना 'गोंयचो सायब' म्हणून संबोधले जाऊ लागले....गोयंचो सायबांविषयीची ही एक आख्यायिका आहे....

याच संत फ्रान्सिस झेवियर यांचा शवदर्शन सोहळा (एक्सपोझिशन) २१ नोव्हेंबरपासून जुने गोव्यात सुरु होत आहे. यानिमित्त झेवियर यांच्या जीवनप्रवास जाणून घेऊयात....

जन्म आणि शिक्षण (Early Life Birth And Education)

फ्रान्सिस झेवियर यांचा जन्म ०७ एप्रिल १५०६ रोजी स्पेनमधील एका श्रीमंत उमराव घराण्यात झाला. झेवियर यांचे शिक्षण पॅरिसमध्ये झाले. तिथेच त्यांनी धार्मिक शिक्षण देखील घेतले. इटलीतील रुग्णालयात त्यांनी रुग्णांची सेवा केली असाही उल्लेख काही ठिकाणी केलेला आढळतो.

भारताच्या दिशेने प्रवास (Journey To India)

फ्रान्सिस झेवियर यांनी ०७ एप्रिल १५४१ रोजी वयाच्या ३५ व्या वर्षी भारताच्या दिशेने प्रवास सुरु केला. तब्बल तेरा महिने प्रवास केल्यानंतर झेवियर गोव्यात दाखल झाले. झेवियर यांनी संपूर्ण आयुष्य पंथप्रचाराला पूर्ण वाहून घेतले व समर्पित केले होते. अतिशय कट्टर व कर्मठ ख्रिस्ती पंथप्रसारक होते.

धर्मप्रसाराचे काम आणि मृत्यू (Death)

संत फ्रान्सिस झेवियर यांनी गोव्यातही धर्मप्रसाराचे काम केले. गोव्यात काही दिवस राहिल्यानंतर ते दक्षिणेतून श्रीलंकेत दाखल झाले. त्याठिकाणी काही काळ व्यतित केल्यानंतर १५५२ रोजी ते पुन्हा गोव्यात आले.

झेवियर यांनी चीनच्या दिशेने प्रवास सुरु केल्यानंतर त्यांना आजारांनी गाठले. आजारात झेवियर यांचे वयाच्या 46 व्या वर्षी शांगच्यान या चिनी बेटावर निधन झाले व तिथेच त्यांचे दफन करण्यात आले.

चीनमधून गोव्यात आणले शव (China to Goa)

फ्रान्सिस झेवियर यांचे शांगच्यान या चिनी बेटावर निधन झाल्यावर तिथेच त्यांचे दफन करण्यात आले. पण त्यांचे शव उकरून काढून मालाका इथे पुरण्यात आले. ते परत उकरून काढून गोव्यात आणून त्याचे ममीकरण करून बासलिका बॉम जिझस या जुन्या गोव्याच्या मुख्य चर्चमध्ये ठेवण्यात आले व आजतागायत आहे.

झेवियर ज्या उजव्या हाताने ते आशीर्वाद व दीक्षा देत, तो कापून रोम येथे प्रदर्शित करण्यात आलेला आहे. फ्रान्सिस झेवियर यांना मरणोत्तर 1622 साली म्हणजे जवळपास सत्तर वर्षांनी संतपद करण्यात आले.

'गोंयचो सायब' पदवी (Goencho Saib)

छत्रपती संभाजी महाराजांनी गोव्यावर आक्रमण केले, फिरंगी सेनेला धूळ चारत महाराज मांडवी नदीच्या किनाऱ्यावर येऊन शेवटच्या हल्ल्याला सज्ज झाले. घाबरलेल्या पोर्तुगीज अंमलदाराने आपला राजदंड फ्रान्सिस झेवियर यांच्या मृतदेहाच्या हातात दिला व प्रार्थना करून करुणा भाकली.

दरम्यान, औरंगजेबाच्या मोगल सेनेने गोव्याच्या दिशेने कूच केल्याचा संदेश ताबडतोब संभाजी महाराजांना आला व सगळी मोहीम अर्धवट सोडून, गोवा पादाक्रांत न करता त्यांना परत फिरावे लागले.

फ्रान्सिस झेवियर यांच्या कृपेमुळेच राजे माघारी फिरले आणि तेव्हापासून त्यांना गोंयचो सायब ही पदवी बहाल करण्यात आली, अशी आख्यायिका प्रचलित आहे. पण, काहीजण या आख्यायिकेला सत्य मानत नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Live News: 151 जयंती अगोदर गोव्यात बिरसा मुंडा यांचा पुतळा उभारला जावा

''...राजकीय सहभागाशिवाय हे शक्यच नाही'', Cash For Job Scam वर लक्ष्मीकांत पार्सेकरांची रोखठोक प्रतिक्रिया

Goa History: छत्रपती व पोर्तुगिजांमध्ये तहनामा

Goa Influencers: "काही काळात मी युट्युबपर्यंत नक्कीच पोहोचेन" Jet Airways ते Wanderlust Foodie पर्यंत प्रवास करणाऱ्या गोव्याच्या अश्रफीची अनोखी गोष्ट

Cyber Crime: एस्कॉर्ट सर्व्हिसच्या नावाखाली वेश्या रॅकेट चालवणाऱ्या टोळीतील तिसरा आरोपी गजाआड; गोवा पोलिसांची कारवाई!

SCROLL FOR NEXT