Saint Francis Xavier Feas Dainik Gomantak
गोवा

Saint Francis Xavier Feast: जुने गोवेत भाविकांचा 'पूर'; नेते, मान्यवरांची उपस्थिती; राहुल गांधी, केजरीवालांकडून शुभेच्छा

Saint Francis Xavier Feast 2025: सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या फेस्ताला बुधवारी (ता.३) राज्यभरातील हजारो भाविकांनी गर्दी केली. सकाळपासून दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या.

गोमंतक ऑनलाईन टीम

जुने गोवे: सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या फेस्ताला बुधवारी (ता.३) राज्यभरातील हजारो भाविकांनी गर्दी केली. सकाळपासून दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या फेस्तानिमित्त अनेक मान्यवरांनी जनतेला शुभेच्छा दिल्या.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शांततेसाठी प्रार्थना करीत श्रद्धाळूंना शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, की हा उत्सव गोव्याच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशातील महत्त्व अधोरेखित करतो. युरी आलेमाव यांनी भाविकांच्या कल्याणासाठी प्रार्थना करीत जुने गोवेतील भक्तांना शांतता, श्रद्धा व कल्याणासाठी प्रार्थना केली.

जुने गोवे येथील चर्च परिसर आज भाविकांच्या गर्दीमुळे भरून गेला होता. सकाळपासून दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अनेकांनी नवस फेडण्यासाठी व नवस बोलण्यासाठी संतांच्या पवित्र लिरिक्ससमोर

प्रार्थना केली. फेस्ताच्या निमित्ताने रस्त्यांवर विविध खाद्यपदार्थ, धार्मिक साहित्य, खेळणी व इतर वस्तूंचे स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. दर्शनानंतर भाविकांनी या स्टॉलवरही गर्दी केली होती.

दरम्यान, आज झालेल्या प्रार्थनेसाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, आमदार एल्टन डिकॉस्ता यांच्यासह मान्यवर व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राहुल गांधी, केजरीवालांकडूनही शुभेच्छा

कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी सेंट झेवियर यांचे कार्याचे स्मरण करीत सौहार्द आणि एकता टिकवण्याचा संदेश दिला. दुसरीकडे, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी समस्त गोमंतकीयांना शुभेच्छा देत समाजाच्या कल्याणासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.

नेटकी वाहतूक व्यवस्था

मोठ्या गर्दीचा विचार करता वाहतूक व्यवस्थापनासाठी विशेष पोलिस पथके तैनात करण्यात आली आहेत. आपत्कालीन सेवांसाठी आरोग्य विभागाचे विशेष पथकेही येथे आहेत. वाहतूक कोंडी न होण्यासाठी शटल बस सेवा आणि पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्ग कधी होणार पूर्ण होणार? नितीन गडकरींनी संसदेत केली मोठी घोषणा; कोकणवासीयांचा वनवास संपणार!

Goa Drug Bust: शिवोलीतील फुटबॉल मैदानाजवळ 7.90 लाखांचं ड्रग्ज जप्त, रत्नागिरीच्या 25 वर्षीय तरुणाला अटक; गोवा पोलिसांची मोठी कारवाई!

'ऑलिम्पिकसाठी गोव्याला सज्ज करा'! रॅकेट खेळांसाठी 'उत्कृष्टता केंद्र' स्थापन करण्याची खासदार तानावडेंची राज्यसभेत मागणी

IndiGo Share Market Loss: विमानं रद्द करणं इंडिगोला पडलं महागात! एका दिवसात तब्बल 7160 कोटींचा फटका, बाजारमूल्यात मोठी घसरण

Goa Politics: 'त्या 11 जागांवर युतीची चर्चाच नव्हती', अमित पाटकरांचा 'धक्कादायक' खुलासा! काँग्रेस आणि आरजीपीमध्ये विस्फोट?

SCROLL FOR NEXT