Saint Francis Xavier Exposition Video Dainik Gomantak
गोवा

Saint Francis Xavier Exposition: वाजत गाजत निघाली गोंयचो सायबाची मिरवणूक; पहिल्या सोहळ्याचे खास Video पाहा

Saint Francis Xavier Exposition Video: भव्य दिव्य सोहळ्याला आर्चबिशप फिलिप नेरी फेर्रांव यांच्यासह विविध ठिकाणचे आर्चबिशप उपस्थित होते.

Pramod Yadav

Saint Francis Xavier Exposition Video

जुने गोवे: गोंयचो सायब संत फ्रान्सिस झेवियर यांच्या दशवार्षिक पार्थिव दर्शन सोहळ्याला ओल्ड गोव्यात २१ नोव्हेंबरपासून सुरुवात झाली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्या उपस्थित या सोहळ्याला सुरुवात झाली.

झेवियर यांचे शव पुढील ४५ दिवसांसाठी सार्वजनिक दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. यासाठी त्यांचे शव बॅसिलिका चर्च ते से कॅथेड्रल येथे बँड आणि संगीताच्या साथीने नेण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणावर भाविक उपस्थित होते.

बॅसिलिका बॉम जिझस ते से कॅथेड्रलपर्यंत संत झेवियर यांचे शव नेण्यात आले या सोहळ्याचे काही व्हिडिओ समोर आले आहेत. ओल्ड गोव्यात मोठ्या भक्तिभावात हा कार्यक्रम पार पडला.

भव्य दिव्य सोहळ्याला आर्चबिशप फिलिप नेरी फेर्रांव यांच्यासह विविध ठिकाणचे आर्चबिशप उपस्थित होते, तसेच, ख्रिस्ती समाजातील बांधव, पर्यटक आणि गोमंतकीयांनी हजेरी लावली होती.

गोव्यात २१ नोव्हेंबर २०२४ ते ०५ जानेवारी २०२५ असे ४५ दिवस ओल्ड गोव्यात संत फ्रान्सिस झेवियर यांचा शव दर्शन सोहळा पार पडणार आहे. यासाठी देश-विदेशातील भाविक हजेरी लावण्याची शक्यता आहे. एका अंदाजानुसार, या सोहळ्याला ४५ दिवसांत ८० लाख भाविक हजेरी लावतील असा अंदाज आहे.

बॅसिलिका चर्चमध्ये या सोहळ्याला सुरुवात झाली तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, मंत्री माविन गुदिन्हो यांच्यासह सरकारी अधिकारी उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'माझ्या दारात संकट नाही, तर मला काय देणे-घेणे?' शतकापूर्वी सावरकरांनी कोरडे ओढलेली संकुचित मानसिकता आजही उभी

Budh Nakshatra Parivartan 2026: 8 ऑगस्टपासून 'या' राशींचे नशीब उजळणार; बुधाच्या नक्षत्र बदलाने यशाचे नवे मार्ग खुलणार

Goa High Court Promotion Case: अवर सचिव भरतीला कोर्टाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला दणका; कायदा विभागातील 2 महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा फेरविचार करण्‍याचा आदेश

36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

SCROLL FOR NEXT