St. Francis Xavier  Dainik Gomantak
गोवा

St Francis Xavier Controversy : गोव्यातील DNA चाचणीचा वाद पोहोचला महाराष्ट्रात; मुंबईतील नागरिकांकडून राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाकडे तक्रार

Saint Francis Xavier DNA Test Row: कॅथलिक समाजाच्या भावना दुखवणारे वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी सुभाष वेलिंगकरांवर अटकेची टांगती तलवार आहे.

Pramod Yadav

Saint Francis Xavier DNA Test Row

पणजी: गेल्या आठवड्यापासून गोव्यात वादंग निर्माण केलेल्या संत फ्रान्सिस झेवियर डिएनए चाचणी मागणीचा वाद आता महाराष्ट्रात पोहोचला आहे. मुंबईतील वॉचडॉग फाऊंडेशनने याप्रकरणी राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग आणि गोवा पोलिसांकडे तक्रार दाखल केलीय.

गोवा आरएसएसचे माजी प्रमुख आणि हिंदू रक्षा महाआघाडीचे निमंत्रक सुभाष वेलिंगकरांनी कॅथलिक संत फ्रान्सिस झेवियर यांच्या मृतदेहाची डीएनए चाचणी करण्याची मागणी केल्याने गोव्यात धार्मिक तेढ निर्माण झाला आहे.

सुभाष वेलिंगकरांनी गोंयचो सायब संत फ्रान्सिस झेवियर यांच्याबाबत केलेले वक्तव्य कॅथलिक समाजाच्या भावना दुखावणारे असल्याचे, मुंबईतील वॉचडॉग फाऊंडेशनने (Watchdog Foundation) म्हटले आहे.

मुंबईतील नागरिकांनी थेट राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाकडे तक्रार दाखल केल्याने सुभाष वेलिंगकरांविरोधात आणखी एका तक्रारीची भर पडली आहे.

वेलिंगकरांच्या वक्तव्याने ख्रिस्ती अल्पसंख्याक समुदायाच्या भावना दुखावल्याचा दावा फाऊंडेशनने केला आहे. गोवा पोलिस गेल्या चार दिवसांपासून वेलिंगकरांचा शोध घेत असून, ते महाराष्ट्रात असल्याचा दावा केला जात आहे.

वेलिंगकर शक्तीप्रदर्शन करत गोवा पोलिसांना शरण येण्याच्या तयारीत असल्याची शक्यता सूत्रांच्या हवाल्याने व्यक्त केली जात आहे.

संत फ्रान्सिस झेवियर यांच्या डिएनए चाचणीच्या मागणीने गोव्यात वाद निर्माण झाला. संतप्त नगारिकांनी रस्त्यावर उतरत निदर्शेने केली, अटकेची मागणी जोर धरु लागल्याने वेलिंगकर बेपत्ता झाले. राज्यातील वातावरण तणावपूर्ण झाल्याने गोवा पोलिसांकडून वेलिंगकरांना दोन नोटीस बजावण्यात आल्या.

धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी अटकेची टांगती तलवार असणाऱ्या वेलिंगकरांनी पणजी न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला. कोर्टने वेलिंगकरांचा जामीन अर्ज फेटाळल्याने त्यांना दिलासा मिळाला नाही.

दरम्यान, गेल्या आठ दिवसांपासून गोव्यात धार्मिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याने वेलिंगकरांची अटक अटळ असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT