Manikrao Ram Naik Gavneka Dainik Gomantak
गोवा

Sahitya Akademi : कोकणी साहित्यिक माणिकराव गावणेकर यांना साहित्य अकादमी पुरस्कार

मुळ बंगाली भाषेतील पुस्तकाचा केला कोकणीत अनुवाद

गोमन्तक डिजिटल टीम

केंद्रीय साहित्य अकादमीचे 2022 चे अनुवाद पुरस्कार गुरुवारी जाहीर करण्यात आले आहेत. कोकणी भाषेत अनुवादासाठी जेष्ठ साहित्यिक माणिकराव राम नाईक गावणेकर यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या श्री राम कृष्ण अमृतवाणी या पुस्तकासाठी त्यांना पुरस्कार जाहिर झाला आहे. मुळ बंगाली भाषेतील निबंधाचे पुस्तक त्यांनी कोकणीत अनुवाद केले आहे.

रोख 50 हजार रुपये व तांब्याचे मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे अशी माहिती साहित्य अकादमीचे सचिव के. श्रीनीवास राव यांनी दिली. माणिकराव नाईक गावणेकर कोकणी चळवळीत कार्यरत होते तसेच त्यांनी वेगवेगळ्या विषयावर पुस्तक लेखन केले आहे. 1 हजार 600 पानांचे रामायण त्यांनी कोकणीत अनुवाद केला आहे. वाल्मीकी रामायणाचे 4 भाग, भक्तीगीते, स्वामी विवेकनंदांवर भक्तीयोग, कर्मयोग अशी बरीच पुस्तके त्यांनी लिहीली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karapur Mega Project: मेगा प्रकल्पाच्या विरोधात कारापूरवासीय आक्रमक,जंतरमंतरवर सोमवारी आंदोलन

VIDEO: बंगळुरूमध्ये धक्कादायक प्रकार! जबरदस्तीने घरात शिरला डिलिव्हरी बॉय; महिलेला प्रायव्हेट पार्ट दाखवला अन्... पाहा व्हिडिओ

Goa Politics: गोव्याच्या 'निधी'चा 'यूपी'त वापर; खासदार सदानंद शेट तानावडेंवर काँग्रेसकडून टीका

FIFA World Cup 2026: स्वित्झर्लंड चितपट! 3-1 ने विजय मिळवत अर्जेंटिनाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री, इंग्लंडविरुद्ध होणार हाय-व्होल्टेज सामना

Goa Drug Case: पणजीत 'अंमली पदार्थ तस्करी'चा पर्दाफाश! 15 लाखांचा गांजा जप्त; दोघांना अटक, मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT