Konkani Language Dainik Gomantak
गोवा

Sadetod Nayak: नव्या पिढीने कोकणी स्वीकारली, हे सुचिन्ह! माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो यांचे वक्तव्य

कोकणी ही गोमंतकीयांना एकत्र आणणारी भाषा आहे.

Kavya Powar

Konkani Language: कोकणी ही गोमंतकीयांना एकत्र आणणारी भाषा आहे. पूर्वी नागरी सेवेत गोमंतकीयांची संख्या बोटावर मोजण्याएवढी होती. मात्र, सध्या हे चित्र बदलले आहे, ही अतिशय चांगली बाब आहे.

कारण, गोव्यातील तरुणांनी कोकणी भाषा आणि संस्कृती पूर्णपणे स्वीकारली आहे, असे मत ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो यांनी व्यक्त केले. रोजगार विनिमय केंद्रात गोमंतकीय तरुणांची वाढती नोंदणी हे त्याचे निदर्शक आहे, असेही ते म्हणाले.

कोकणी राजभाषा व्हावी आणि गोव्याला राज्याचा दर्जा मिळावा यासाठी फालेरो यांनी मोठी आंदोलने केली होती, या पार्श्‍वभूमीवर त्यांनी ‘द बॅटल फॉर कोकणी अँड स्टेटहूड ऑफ गोवा’ हे पुस्तक लिहिले असून या पुस्तकाच्या प्रकाशनाआधी एक दिवस ‘दै. गोमन्तक’चे संपादक-संचालक राजू नायक यांच्याशी त्यांनी ‘सडेतोड नायक’ कार्यक्रमात मोकळेपणाने चर्चा केली. आज बहुतेक तरुण जीवनाच्या सामाजिक पैलूंमध्ये गुंतलेले नाहीत, हे चांगले नाही, असेही फालेरो म्हणाले.

भूतकाळावर प्रकाश टाकताना लुईझिन फालेरो म्हणाले की, ते उद्योगमंत्री असताना उद्योगांनी ८० टक्के नोकऱ्या गोव्यातील लोकांना द्याव्यात, असा नियम त्यांनी आणला होता. पण त्या काळात गोवावासीयांना फक्त सरकारी नोकऱ्यांमध्येच रस होता. आता परिस्थिती अशी आहे की गोव्यातील लोकांना उद्योगांमध्ये खासगी नोकऱ्या मिळत नाहीत. मी सत्तेत असताना १५ वर्षांचे गोव्याचे रहिवासी प्रमाणपत्र आणि सरकारी कामकाजात कोकणी भाषेचे ज्ञान सक्तीचे केले.

कोकणीसाठी मोठा संघर्ष!

कोकणी भाषेचा गोव्याला समृद्ध वारसा लाभला आहे आणि तो भावी पिढीपर्यंत पोहोचविणे हे आपले कर्तव्य आहे. गोवा मुक्तीनंतर कोकणी ही राज्याची अधिकृत भाषा व्हावी, यासाठी गोमंतकीयांनी मोठे आंदोलन केले.\

कोकणीला राजभाषेचा दर्जा मिळावा यासाठी या आंदोलनात अनेकांनी बलिदान दिले आणि अनेक संकटांचा सामना केला. गोव्याची अस्मिता आणि कोकणीच्या रक्षणासाठी ३५ वर्षांपूर्वी केलेले आंदोलन आणि संघर्ष याविषयी आजच्या पिढीला माहिती नाही, ही चिंतेची बाब असल्याचे लुईझिन फालेरो यांनी नमूद केले.

गोव्यात मगो पक्ष चारवेळा निवडून आला. हा पक्ष गोवा महाराष्ट्रात विलीन करण्याच्या मताचा होता आणि मराठीला गोव्याची राजभाषा मानत होता. पण जेव्हा काँग्रेस सत्तेवर आला तेव्हा मी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भेट घेतली आणि त्यांना सांगितले की गोव्याला राज्याचा दर्जा मिळावा अशी लोकांची मोठी मागणी आहे. त्यावेळी त्यांनी मला राजभाषा ठरवायला सांगितली आणि मग प्रत्यक्षात भाषा आंदोलनाला सुरवात झाली.

- लुईझिन फालेरो, माजी मुख्यमंंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: गोवा फॉरवर्ड अजूनही काँग्रेस युतीचा घटक! आमची भूमिका निश्चितपणे मांडू- विजय सरदेसाई

RCB Fans Lathi Charge Video: आरसीबीचा विजय फॅन्सच्या अंगाशी! हुल्लडबाजी नडली, पोलिसांनी काठीनं चोप चोप चोपलं; पाहा व्हिडिओ

Donald Trump: अमेरिकेत नवा वाद! जॉर्ज वॉशिंग्टन, अब्राहम लिंकन यांच्या पंक्तीत आता डोनाल्ड ट्रम्प; 'त्या' फोटोनं जगाला चक्रावलं

Viral Video: मृत्यूच्या दाढेत 4 तास! रोलर कोस्टर बंद पडल्यानं 100 फूट उंचीवर अडकली 8 शाळकरी मुलं; 22 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल

खरी कुजबुज: काय, काँग्रेसने 'चिफ सेल्स ऑफिसर' नेमलाय?

SCROLL FOR NEXT