Sadanand Tanavade Dainik Gomantak
गोवा

Sadanand Shet Tanavade: विरोधकांकडे मुद्दे नसल्याने ईव्हीएमचा प्रश्र्न: सदानंद तानावडे

Sadanand Shet Tanavade: भारतीय जनता पक्ष जेव्हा एखादी निवडणूक जिंकतो, तेव्हा ईव्हीएमचा प्रश्र्न उपस्थित केला जातो.

दैनिक गोमन्तक

Sadanand Shet Tanavade: भारतीय जनता पक्ष जेव्हा एखादी निवडणूक जिंकतो, तेव्हा ईव्हीएमचा प्रश्र्न उपस्थित केला जातो. सध्या विरोधकांकडे मुद्दे नसल्याने त्यांनी ईव्हीएमचा गैरवापर केला जातो, बॅलटद्वारे निवडणूक घ्या, असे लोकांच्या मनात बिंबवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

मात्र भारतीय मतदार सूज्ञ आहेत. त्यांना खरेपणा व खोटेपणा याची पारख योग्य प्रकारे करता येते, त्यामुळे भारतीय जनता पक्षाला आगामी लोकसभा निवडणुकीत काहीच फरक पडणार नाही.

केंद्रात भाजपचे सरकार मोठ्या मताधिक्याने व गोव्यातही दोन्ही जागा जिंकणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी आज मडगावात पत्रकारांना सांगितले.

तेलंगणा व कर्नाटकमध्ये कॉंग्रेसचा विजय झाला. तिथे ईव्हीएमचा वापर केला नव्हता का? असा प्रश्र्न ही त्यांनी उपस्थित केला.

भारतीय जनता पक्षा कुठलीही निवडणूक एक आव्हान म्हणून स्वीकारतो. मग ती पंचायत, नगरपालिका, राज्य किंवा लोकसभेची निवडणूक असो.

वर्षभर पक्षाचे विविध कार्यक्रम देशभर सुरू असतात. आता 11 फेब्रुवारीपासून पक्षाचे पदाधिकारी गोव्यातील सर्व बुथांना भेट देणार असून बूथ समित्यांचे पदाधिकारी

व कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधणार असल्याचेही तानावडे यांनी सांगितले. आमचे पक्षासाठी काम असते, त्यात वैयक्तिक स्वार्थ नसतो असेही त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT