Sadanand Tanawade  Dainik Gomantak
गोवा

दोन लाख चौ.मी. जमीन विकसित करणार: सदानंद तानावडे

पणजी-रायबंदर बगलमार्गालगत साकारणार प्रकल्प

दैनिक गोमन्तक

पणजी: गोवा आर्थिक विकास महामंडळातर्फे पणजी-रायबंदर बगलमार्गाशेजारील 2 लाख चौरस मीटर जमीन विकसित करून प्रकल्प उभारणार असल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दिली.

महामंडळाच्या आज (गुरुवारी) झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री रोजगार योजनेची व्याप्ती वाढवणार असल्याचे सांगून रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले.

व्यवसायासाठी सरकारकडून प्रोत्साहन दिले जात असून, युवकांनी यापुढे नोकरीच्या मागे न धावता व्यवसायासाठी पुढे यावे. यासाठी अर्थसाहाय्य दिले जाणार असल्याचेही तानावडे यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, आर्थिक विकास महामंडळातर्फे विविध प्रकारच्या योजना सुरू केल्या असून, यातील महत्त्वपूर्ण लोकोपयोगी योजना, राज्यातील उद्योजकांना आर्थिक साहाय्य पुरवण्याबरोबरच मुख्यमंत्री रोजगार योजना, व्यक्तिगत कर्ज योजना आणि एसटी बांधवांसाठीच्या विशेष कर्ज योजनांचा समावेश आहे. 2019-20 या सालात कोरोना संकटामुळे औद्योगिक विकासाला खीळ बसली होती. याचा परिणाम महामंडळाच्या नफ्यावर झाला होता. तर 2020-21 मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात महामंडळाला 67 कोटींचा नफा झाला असून, महामंडळाने कोरोना संकट काळात मुख्यमंत्री रिलीफ फंडासाठी 1 कोटी दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT