Sadanand Shet Tanavade Goa BJP President Dainik Gomantak
गोवा

मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर काँग्रेस आमदारांची फ्रेंडशीप मीटिंग? तानावडेंचं थेट उत्तर

काँग्रेस आमदार आपले प्रश्न मांडण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गेल्याचा दावाही तानावडेंनी केला आहे.

आदित्य जोशी

पणजी : गोव्यात काँग्रेस आमदारांचा संभ्रम अजूनही संपलेला नाही. मायकल लोबो आणि दिगंबर कामत अजूनही भाजपच्या संपर्कात असून काँग्रेस आमदारांना फुस लावण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप होत आहे. त्यातच मायकल लोबोंसह काँग्रेसचे काही आमदार मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या निवासस्थानावर दिसून आले होते. आता सदानंद शेट तानावडेंनी यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर झालेल्या फ्रेंडशीप मीटिंगबद्दल प्रश्न विचारला असता गोवा भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडेंनी थेट उत्तर दिलंय. मुख्यमंत्री हा कुठल्याही पक्षाचा नसतो, तर तो सर्वांचा असतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना भेटायला कुणीही येऊ शकतं, त्याला पक्षाचं बंधन नसतं अशी प्रतिक्रिया तानावडेंनी दिली आहे. तसंच काँग्रेस आमदार भाजपचं कार्यालय त्यादिवशी बंद असल्याने आपले प्रश्न मांडण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गेल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

दुसरीकडे गोव्यात ऑपरेशन लोटस करायचंच असेल तर अर्धवट सोडणार नाही. ते पूर्णत्वास नेणार असा दावाही तानावडेंनी केला आहे. गोव्यात सध्या भाजपचं ऑपरेशन लोटस फसल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. मात्र तानावडेंनी या सर्व वृत्तांचं खंडन करत भाजपचा सध्यातरी असा कोणताही मनसुबा नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तसंच काँग्रेसचा कोणताही आमदार भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून आपल्या संपर्कात नसल्याचंही ते म्हणाले आहे.

शिवोलीच्या आमदार आणि मायकल लोबो यांच्या पत्नी दिलायला लोबो नुकत्याच भाजप कार्यकर्त्यांसह दिसल्या होत्या. मात्र राजकीय विरोधक असू शकतात, पण तरीही गोवा छोटं राज्य असल्यामुळे सर्वांचे एकमेकांशी चांगले हितसंबंध असतात असंही तानावडेंनी सांगितलं आहे. गिरीश चोडणकर काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते असूनही आपले चांगले मित्र आहेत हे सांगायलाही ते विसरले नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT