Sadanand Shet Tanavade Dainik Gomantak
गोवा

गोव्यात भाजपचं सरकार भक्कम; आमदार फुटीमध्ये तथ्य नाही

स्थानिक पातळीवर चर्चा झाल्याशिवाय निर्णय होत नसतो; गोवा भाजप प्रदेशाध्यक्ष तानावडेंचा दावा

दैनिक गोमन्तक

योगेश मिराशी

पणजी : गोव्यात भाजपचे भक्कम सरकार आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष या नात्याने माझ्याकडे कोणत्याही आमदाराने संपर्क केलेला नाही. असे काही असल्यास सर्वांत अगोदर मला समजेल, अशा शब्दात भाजपा प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी गोव्यातील उलटसुलट राजकीय चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

जर हा प्रश्न थेट केंद्रीय नेत्याकडे गेला असल्यास देखील स्थानिक पातळीवर चर्चा झाल्याशिवाय निर्णय होत नसतो. अजून तरी किंवा आतापर्यंत कोणतीच माहिती याविषयी मिळालेली नाही, असंही भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी स्पष्ट केलं आहे. सदानंद शेट तानावडेंनी राज्यात सुरु असलेल्या राजकीय वादावरही थेट निशाणा साधला आहे.

दरम्यान माजी मंत्री मायकल लोबो यांनी बेकायदा गोष्टी केल्या असतील, तर त्यावर कारवाई व्हायलाच हवी, असं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी लोबो-राणे वादामध्ये उडी टाकली आहे. विश्वजीत राणे यांनी गेल्या काही दिवसांमध्ये मायकल लोबोंविरोधात कारवाईची भाषा करत त्यांची दोन रिसॉर्ट पाडणार असल्याचंही सांगितलं होतं. यानंतर काँग्रेस नेत्यांनी राणेंवर निशाणा साधला होता. आता भाजप प्रदेशाध्यक्ष यांनीही या वादात उडी टाकल्याने राजकारण चांगलंच तापलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bank Holiday: संप, शनिवार-रविवारची सुट्टी अन्‌ गणेश चतुर्थी! शुक्रवारपासून बँका सलग 5 दिवस बंद; ग्राहकांची होणार गैरसोय

Horoscope: शुक्रवार ठरणार भाग्यवान! 'या' राशींना मिळणार शुभवार्ता; नोकरी, व्यवसायात यशासोबत आर्थिक लाभाचीही शक्यता

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

SCROLL FOR NEXT