Sadanand Shet Tanavade: Quepem BJP's public relations campaign Gomantak Digital Team
गोवा

Quepem news : पक्षकार्य तळागाळात पोचवा : सदानंद शेट तानावडे

सदानंद शेट तानावडे : केपेत भाजपचे जनसंपर्क अभियान

गोमन्तक डिजिटल टीम

केपे : केंद्रात व राज्‍यात भाजप सरकारने उत्‍कृष्‍ट कार्य केलेले आहे. तरीसुद्धा कार्यकर्त्यांनी शांत न बसता पक्षाचे कार्य तळागाळापर्यंत पोचवावे, असे आवाहन भाजप प्रदेशाध्‍यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी केले.

केंद्रात भाजप सरकारने गेल्या 30 मे रोजी 9 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्याने राज्यात विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ‘सेवा सुशासन व गरीब कल्याण’ या कार्यक्रमांअंतर्गत तानावडे यांनी केपे येथे भेट दिली. त्‍यावेळी ते बोलत होते.

यावेळी माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, नगराध्यक्ष सुचिता शिरवईकर, जिल्हा पंचायत अध्यक्ष सुवर्णा तेंडुलकर, शाणू वेळीप, नगरसेवक दयेश नाईक, चेतन हळदणकर व कार्यकर्ते उपस्थित होते. केंद्रात भाजप सरकारने जी कामे केली आहेत, त्याची माहिती लोकांपर्यंत पोचली पाहिजे. यासाठी आम्ही या महिन्यात अनेक कार्यक्रम आयोजित केले आहेत, असे तानावडे म्‍हणाले.

बाबू कवळेकर यांच्‍यामुळेच केपेचा सर्वांगीण विकास

केपे मतदारसंघाचा विकास खऱ्या अर्थाने भाजपच्या कारकिर्दीत झाला. 2019 मध्ये जेव्हा बाबू कवळेकर यांनी भाजपमध्‍ये प्रवेश केला, त्यावेळी त्यांनी अनेक विकासकामांना सुरूवात केल. कवळेकर यांनी ज्या कामांचा पाठपुरावा करून जी कामे मंजूर करून घेतली होती, त्याची जाणीव नगरसेवक व पंचसदस्यांना असल्याने ते कवळेकर यांना त्या कामाच्‍या उद्‌घाटन कार्यक्रमांना निमंत्रण देत असता, असे तानावडे यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa London Flight: अहमदाबाद क्रॅशनंतर बंद झालेली एअर इंडियाची गोवा - लंडन विमानसेवा पुन्हा सुरु होणार, बुकिंग सुरु; वाचा वेळापत्रक

Goa Politics: ठरलं! दिगंबर कामत, रमेश तवडकर होणार मंत्री; गुरुवारी 12 वाजता राजभवनात शपथविधी सोहळा

Goa Minister Resigned: पर्यावरण मंत्री आलेक्स सिक्वेरा यांचा राजीनामा; गुरुवारी तवडकर, कामत घेणार शपथ

Asia Cup 2025: ‘...काही फरक पडत नाही’, भारत-पाकिस्तान सामन्यावर वसीम अक्रमचं मोठं वक्तव्य; पाहा काय म्हणाले VIDEO

Viral Video: ‘डिग्रीची किंमत घटली...’! फिरायच्या नादापायी केलं ट्रक ड्रायव्हरसोबत लग्न; महिलेचा अतरंगी व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT