ED Raid Dainik Gomantak
गोवा

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Goa Credit Society Fraud Case: गेल्या काही महिन्यांपासून वझरकर हे कथित बोगस दस्तऐवजांच्या आधारे जमीन हडप केल्याच्या आरोपांमुळे चर्चेत होते.

Pramod Yadav

पणजी: गोव्यात ईडीने झाडाझडती करत दोन ठिकाणी कारवाई केली. सडा अर्बन को – ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेडमध्ये आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ईडीने छापा टाकला. सक्तवसुली सेचालनालयाच्या पणजी विभागीय कार्यालयाने सोसायटीची १.०५ कोटी रुपयांच्या दोन स्थावर मालमत्ता जप्त केल्या.

तसेच, सुकूर येथील माजी सरपंच आणि जमीन हडप प्रकरणातील संशयित मुख्य आरोपी संदीप वझरकर यांच्या घरी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) छापा टाकला.

शुक्रवारी (०४ जुलै) पहाटे साडेपाच-सहा वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली असून त्यांच्या काही जवळच्या सहकाऱ्यांच्या निवासस्थानांवरही छापे टाकण्यात आले आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून वझरकर हे कथित बोगस दस्तऐवजांच्या आधारे जमीन हडप केल्याच्या आरोपांमुळे चर्चेत होते. ईडीने याआधी त्यांच्या विरोधात मोठी कारवाई करत ८ हजार ५४ चौरस मीटर इतकी जमीन ताब्यात घेतली होती.

या जमिनीची अंदाजे किंमत तब्बल ३.१९ कोटी रुपये इतकी असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. आजच्या कारवाईत ईडीच्या अधिकाऱ्यांनी सुकूर गावात वझरकर यांच्या घरात तपासणी केली आहे. यासोबतच त्यांचे काही निकटवर्तीय ज्यांच्यावर आर्थिक व्यवहारात सहभागाचा संशय आहे, त्यांच्यावरही छापे टाकण्यात आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT