Sachin Tendulkar Dainik Gomantak
गोवा

Sachin Tendulkar @50 : सचिनचा 50वा वाढदिवस साजरा होणार गोव्यात

सेलिब्रेशनबाबत गुप्तता : पत्नी अंजली, मुलगी सारा तेंडुलकरही दाखल

दैनिक गोमन्तक डिजिटल

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा आज 24 रोजी वाढदिवस आहे. तो आपला 50वा वाढदिवस साजरा करण्यासाठी मुलगी सारा आणि बायको अंजलीसोबत गोव्यात दाखल झाला आहे. मुलगा अर्जुन आयपीएलमध्ये व्यस्त असल्यामुळे तो आपल्या वडिलांच्या वाढदिवसाला हजर राहणार की नाही याबाबत शंका आहे.

काल सकाळी सचिन तेंडुलकर आज मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाला असून त्याच्या आगमनाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आपला वाढदिवस तो राज्यात नेमक्या कोणत्या ठिकाणी साजरा करणार आहे, याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही. त्याच्या या 50 वा वाढदिवसानिमित्त मोठी जंगी पार्टी होणार असल्याच्या चर्चा आहे.

अनोखा योगायोग

सचिन आणि गोव्‍याचे विशेष नाते आहे. आपला सुवर्णमहोत्‍सवी वाढदिवस साजरा करण्‍यासाठी म्‍हणूनच तो गोव्‍यात पोहोचला आहे. त्‍याच्‍या सुरक्षेसाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्‍यात आला आहे. विशेष म्हणजे, याच दिवशी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचाही 50वा वाढदिवस आहे. त्यामुळे हे दोन दिग्गज भेटून एकमेकांना शुभेच्छा देतील का? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

मुंबईतही सेलिब्रेशन

मुंबईत शनिवारी मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात रोमांचक सामना झाला. या सामन्यात सचिनही पोहोचला आणि त्याने आपला वाढदिवस संघासोबत साजरा केला. सचिनने यावेळी स्टेडियममध्ये मोठा केकही कापला. यंदा त्याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये खेळत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT