S. P. Singh Baghel Dainik Gomantak
गोवा

Uniform Civil Code : काहीही होऊदे; देशात समान नागरी कायदा लागू करणारच

एका विशिष्ट धर्माचे लोक जर विशिष्ट धर्मातील मुलींना रणनिती ठरवून विवाह करण्याचा प्रयत्न करता अशा लोकांवर कारवाई व्हायला हवी, असे मत केंद्रीय कायदा राज्यमंत्री एस. पी. सिंग बघेल यांनी व्यक्त केले.

गोमन्तक डिजिटल टीम

Uniform Civil Code : प्रेमामध्ये जात-पात, धर्म तसेच ठिकाण याचा काहीही संबंध नाही. जिहाद हा जुमला नाही, मात्र एका विशिष्ट धर्माचे लोक जर विशिष्ट धर्मातील मुलींना रणनिती ठरवून विवाह करण्याचा प्रयत्न करत असतील तर अशा लोकांवर कारवाई व्हायला हवी, असं मत केंद्रीय कायदा राज्यमंत्री एस. पी. सिंग बघेल यांनी व्यक्त केलं आहे. त्यांनी पर्वरी येथील मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाच्या इमारतीच्या पाहणी केली तसेच गोवा ॲडव्होकेट्स बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या सूचनाही ऐकून घेतल्या.

देशातील गोवा हे एकमेव राज्य आहे ज्या ठिकाणी समान नागरी कायदा लागू आहे. त्यामुळे इतर राज्यांमध्येही त्याची अंमलबजावणी करण्याचा विचार आहे का असे पत्रकारांनी बघेल यांना विचारले. यावेळी मंत्री बघेल म्हणाले की, भाजपच्या अजेंड्यावर हा विषय आहे. जात, धर्म वेगवेगळे असले तरी देश हा एक आहे. त्यामुळे देशात एकच कायदा असायला हवा. हा देश काही विशिष्ट गटांचा नाही तर तो एक आहे. त्यामुळे या समान नागरी कायदा देशात लागू करण्याचा प्रयत्न असेल.

देशातील त्रिपुरा, मेघालय आणि मणिपूर या गोव्याप्रमाणेच असलेल्या छोट्या राज्यांसाठी स्वतंत्र उच्च न्यायालय आहे. गोव्यात स्वतंत्र उच्च न्यायालयासाठी आजपर्यंत प्रस्ताव आलेला नाही. गोवा ॲडव्होकेट्स बार असोसिएशनने त्यासंदर्भात प्रस्ताव पाठवलेला नाही. सरकारला जर स्वतंत्र उच्च न्यायालयाची गरज आहे आणि त्यासाठी सरकार किंवा राज्यपालांनी केंद्राकडे प्रस्ताव पाठवल्यास त्यावर विचार केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

केंद्रीय कायदा राज्यमंत्री एस. पी. सिंग बघेल हे सध्या गोवा दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी उच्च न्यायालयातील खटल्यांची स्थिती जाणून घेतली. अतिरिक्त सॉलिसिटर जनरल प्रवीण फळदेसाई आणि गोवा ॲडव्होकेट्स बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांबरोबर त्यांनी चर्चा केली. या खंडपीठाच्या इमारतीतील सुविधांबाबतही त्यांनी विचारणा केली. खंडपीठाच्या इमारतीला भेट दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, ही आपली सदिच्छा भेट होती. नव्या इमारतीच्या बांधकामानंतर ही आपली पहिलीच भेट आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT