S Jaishankar And Bilawal Bhutto At Sco Meeting Goa  ANI
गोवा

गोव्यातील SCO बैठकीत परराष्ट्रमंत्री जयशंकर पाकच्या बिलावल भुट्टोंवर का नाराज होते? त्यांनीच सांगितले कारण

अनेक वर्षांनी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री भारतात आले होते.

Pramod Yadav

गोव्यात झालेल्या SCO शिखर परिषद अनेक अर्थाने महत्वाची होती. विशेष म्हणजे अनेक वर्षांनी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री भारतात आले होते. परिषदेच्या वेळी डॉ. जयशंकर भुट्टो यांच्यावर नाराज असल्याच्या बातम्या आल्या समोर होत्या. यावेळी नक्की काय घडले होते यावर खुद्द परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी माहिती दिली आहे.

परराष्ट्रमंत्री एस जयशंकर 'आज तक'च्या 'सीधी बात' या विशेष कार्यक्रमात बोलत होते. गेली नऊ वर्षे आणि सध्याच्या चार वर्षात भारताच्या परराष्ट्र धोरणात मोठा फरक झाल्याचे जयशंकर यांनी सांगितले.

'देशाचे पंतप्रधान बदलले आहेत, देश बदलला आहे. तर, देशाचे परराष्ट्र धोरणही बदलणे स्वाभाविक आहे. परराष्ट्र धोरणांच्या बाबतीत आमची क्षमता वाढली आहे. आज आपण आपली भूमिका बिनधास्तपणे जगासमोर मांडू शकतो आणि आपल्या लोकांचे हित लक्षात घेऊन काम करू शकतो. गेल्या 9 वर्षात आणि सध्याच्या चार वर्षातही परराष्ट्र धोरणात मोठा फरक झाला आहे.' असे एस जयशंकर यांनी नॉन-अलोकेशन आणि मल्टी-अलोकेशन यातील फरक सांगतांना म्हटले आहे.

'राजकारण्यांचा जनतेशी थेट संबंध असतो. परराष्ट्र धोरणाला जनतेच्या हिताशी जोडण्यात सरकारला यश आलं आहे. कोविडच्या काळात याचा परिचय आला. सरकारला 'परराष्ट्र धोरण तुमच्यासाठी' हे धोरण यशस्वी करण्यात यश आले आहे. यामुळे तुमचे सरकार तुमच्या पाठीशी उभे आहे, असे सामान्य जनतेला वाटते.' असे एस जयशंकर म्हणाले.

गोवा SCO शिखर परिषदेत जयशंकर बिलावल भुट्टो यांच्यामुळे नाराज होते का?

'अजेंडा ठरलेल्या एखाद्या बैठकीला तुम्ही हजेरी लवता तेव्हा त्यासंबधित चर्चा होणे अपेक्षित असते. भुट्टो एससीओच्या बैठकीत दुसऱ्याच विषयावर बोलू लागले. बिलावल भुट्टो गोवा SCO समिटसाठी आल्यानंतर अजेंड्यावर बोलतील अशी अपेक्षा होती मात्र, ते काश्मीरवर बोलू लागले. दहशतवादाला समर्थन देऊ लागले. हे चुकीचे असून, भुट्टो व्यासपीठाचा गैरवापर करत होते. पण, रागावलो नव्हतो.' असे जयशंकर यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SCROLL FOR NEXT